उपनिषदांमधील संदर्भ घेऊन स्वामी विवेकानंद यांचा तरुणांविषयीचा विचार !

स्वामी विवेकानंद

उपनिषदांनी सांगितलेली ‘तरुण’ या शब्दाची व्याख्या पुष्कळ सुंदर आहे. तरुण हा साधू आणि नेहमी विद्यार्थी असावा. तरुण हा आशावादी, दृढ इच्छा असणारा आणि बलवान अशा ३ गुणांनी युक्त असतो. स्वामी विवेकानंद यांनी हाच विचार पुढे नेत तरुणांना हाक दिली आणि ‘सद्गुणांनी युक्त असे अन् विचारांनी भारावलेले १०० तरुण जरी मला मिळाले, तरी मी जग घालून सोडीन’, असा विचार मांडला.

विवेकानंद म्हणतात, ‘Act on the educated young men, bring them together, and organise them. Great things can be done by great sacrifices only. No selfishness, no name, no fame, yours or mine, nor my Master’s even ! Work, work the idea,the plan, my boys, my brave, noble, good soul-to the wheel, to the wheel put your shoulders.’’’ (भावार्थ : सुशिक्षित तरुणांना एकत्र आणण्याची योजना करा, त्यांना एकत्र आणा, संघटित करा. महान गोष्टी महान त्यागानेच होऊ शकतात. ना स्वार्थ, ना नाव, ना कीर्ती, ना तुझी, ना माझी, ना माझ्या सद्गुरूंची ! काम करा, कल्पनेवर वा योजनेवर काम करा. माझ्या मुलांनो, माझ्या शूर, थोर आणि चांगला आत्मा असलेल्या चाकाला, चाकाला खांदे लावा !)

(साभार : त्रैमासिक ‘सद्धर्म’, जुलै २०२३)