Acharya Vidyasagar Maharaj : जैन संत आचार्य श्री १०८ विद्यासागर महाराज यांनी केला देहत्याग !
लोकांमध्ये श्रद्धाभाव जागृत करण्यासाठी ते ओळखले जात ! – पंतप्रधान
रायपूर (छत्तीसगड) – जैन धर्मातील दिगंबर पंथियांचे सुविख्यात संत आचार्य श्री १०८ विद्यासागर महाराज यांनी देहत्याग केला आहे. वृद्धापकाळाने १७ फेब्रुवारीच्या उत्तररात्री २ वाजून ३५ मिनिटांनी त्यांनी राज्यातील डोंगरगड या ठिकाणी देहत्याग केला. ते ७७ वर्षांचे होते.
My thoughts and prayers are with the countless devotees of Acharya Shri 108 Vidhyasagar Ji Maharaj Ji. He will be remembered by the coming generations for his invaluable contributions to society, especially his efforts towards spiritual awakening among people, his work towards… pic.twitter.com/jiMMYhxE9r
— Narendra Modi (@narendramodi) February 18, 2024
आचार्य श्री १०८ विद्यासागर महाराज दार्शनिक साधू होते. शिष्यवृत्ती आणि तपश्चर्या यांसाठी त्यांची ओळख होती. त्यांनी राजस्थानमध्ये दीक्षा घेतली; पण त्यांनी बहुतेक वेळ बुंदेलखंड भागामध्ये वास्तव्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आचार्य विद्यासागर यांच्या निर्वाणाची बातमी कळल्यानंतर आदरांजली वाहिली. पंतप्रधान म्हणाले की, येणार्या पिढ्या आचार्य विद्यासागर आणि त्यांनी केलेले कार्य कायम लक्षात ठेवतील.
Jain Muni Acharya Shri 108 Vidyasagar Maharaj passes away.
He was known to awaken faith in people. – Prime Minister Modi. pic.twitter.com/n2W8mJlKrq
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 18, 2024
लोकांमध्ये श्रद्धाभाव जागृत करण्यासाठी ते ओळखले जात. डोंगरगड या ठिकाणी मी याच वर्षी त्यांची भेट घेतली होती. मी त्यांना आदरांजली वहातो. देहलीत आयोजित एका कार्यक्रमात आदरांजली वहातांना पंतप्रधान भावुक झाले.