Pastors Sexually Assaulted Minor : नेवासे तालुक्यातील (अहिल्यानगर) विलियर्ड्स चर्चमध्ये धार्मिक कार्यक्रमाच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण !
चर्चमध्ये अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करणार्या पास्टरला अटक !
अहिल्यानगर – नेवासे तालुक्यातल्या सोनई जवळील बेल्हेकरवाडी परिसरात असलेल्या विलियर्ड्स चर्चमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वाईट प्रकार चालत असल्याची स्थानिक रहिवाशांमध्ये चर्चा होती; मात्र ही गंभीर गोष्ट १५ फेब्रुवारीला चव्हाट्यावर आली आणि या चर्चमध्ये धार्मिक कार्यक्रमाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण होत असल्याचे स्पष्ट झाले. या चर्चच्या परिसरात उत्तम वैरागर नावाचा नराधम पाचव्या इयत्तेत शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करत असल्याचे स्थानिक जागरूक ग्रामस्थांना समजताच काही युवकांनी त्या प्रकाराचे गुप्तपणे ‘व्हिडिओ’ चित्रीकरण केले. तो ‘व्हिडिओ’ सोनई पोलिसांना देण्यात आला. घटनेचे गांभीर्य ओळखून सोनई पोलिसांनी नराधम उत्तम वैरागर याला तात्काळ अटक केली. रात्री उशिरा या प्रकरणी पोस्को अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला. हे चर्च अवैध असून या चर्चच्या परिसरात अनेक दिवसांपासून धार्मिकतेच्या नावाखाली घाणेरडे प्रकार चालू असल्याचे समजते.
उत्तम वैरागर याने अल्पवयीन मुलीला पैसे आणि चॉकलेटचे आमीष दाखवून तिचे लैंगिक शोषण केले. उत्तम वैरागर नावाच्या नराधमाविरुद्ध कठोर कारवाई करा, अशी विनवणी त्या मुलीच्या आजोबांनी सोनई पोलिसांना केली आहे. या संतापजनक प्रकाराची माहिती समजताच सोनई पोलीस ठाण्यात सकल हिंदू समाज बांधवांसह सहस्रो तरुणांनी संबंधित नराधमाविरुद्ध गुन्हा नोंद करण्याची मागणी करत सोनई पोलीस ठाण्याच्या आवारात ठिय्या आंदोलन केले. शेवगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन पाटील यांना याविषयी माहिती मिळताच ते सोनई पोलीस ठाण्यात आले. रात्री १२ वाजेपर्यंत पोलीस ठाण्यात थांबून त्यांनी गुन्हा नोंद करण्याचे पोलिसांना निर्देश दिले.
आरोपीच्या समर्थनार्थ न्यायालयामध्ये १५० ख्रिस्त्यांचा जमाव !
गावातील ख्रिस्त्यांनी त्यांच्या भ्रमणभाषच्या स्टेट्सवर आरोपीला वाचवण्यासाठी लिखाण ठेवले होते. ‘सर्व ख्रिस्ती बंधू-भगिनींना विनंती आहे की, सोनई गावातील देवाचा आपला अनभिषिक्त सेवक खोटा आरोप करून कारागृहात टाकण्यात आला आहे, मग आपण सर्वजण त्याच्यासाठी प्रार्थना आणि उपवास करू.’ त्या ख्रिस्ती पास्टरसाठी मर्सिडीज, ऑडी, जग्वार अशा गाड्यांमधून न्यायालयामध्ये साधारणपणे १५० लोक जमले होते, जे आजूबाजूच्या जिल्ह्यांमधून आले होते. (आरोपी आणि रंगेहात सापडलेल्या वासनांध पास्टरसाठी ख्रिस्ती एवढ्या संख्येत येतात, यातून त्यांचा या शोषणाला पाठिंबा आहे, असे समजायचे का ? या सर्वांचीच चौकशी करणे आवश्यक आहे. – संपादक)
संपादकीय भूमिकादेशात आणि विदेशातही चर्चमध्ये अल्पवयीन अन् प्रौढ मुली यांचे लैंगिक शोषण झाल्याच्या घटना सातत्याने घडत असतात; मात्र प्रसारमाध्यमे अशा बातम्यांना मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी देत नाहीत. हिंदु संतांवर खोटे आरोप करून त्यांची अपकीर्ती करणारी प्रसारमाध्यमे अशा घटनांविषयी मौन बाळगतात, हे लक्षात घ्या. अशा नराधमांना कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे. |