(म्हणे) ‘शांततेसाठी पाकिस्तान समवेत चर्चा करा !
मणीशंकर अय्यर यांचा भारत सरकारला फुकाचा सल्ला !
पणजी – काँग्रेसचे मणीशंकर अय्यर १७ फेब्रुवारीला म्हणाले, ‘‘भारत-पाकिस्तान यांनी मतभेद सोडवण्यासाठी चर्चा करणे आवश्यक आहे, तरच शांतता प्रस्थापित होऊ शकते.’’ गोवा येथे १२ व्या गोवा कला आणि साहित्य महोत्सवात ‘सेक्युलर कट्टरवाद्यांच्या आठवणी’ या विषयावर ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘पाकच्या सामान्य लोकांत भारत आणि भारतीय यांच्याविषयी प्रेमळ भावना आहेत. या सद्भावनेचा लाभ घेतला पाहिजे. पाक सरकारशी भारतातील सरकार कोणतीही चर्चा करत नाही.’’ (अय्यर यांनी पाकला हा सल्ला कधी दिला का ? मुंबईवर आक्रमण करण्यासाठी आतंकवादी पाठवणे, काश्मीरमध्ये आतंकवाद्यांच्या माध्यमातून निष्पाप हिंदूंच्या हत्या करणे, शस्त्रसंधीचे उल्लंघन करून सीमारेषेवर गोळीबार करणे, यांविषयी अय्यर यांनी कधी पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत का ? – संपादक)