अमेरिकन वाणिज्य वकिलातीला धमकी देणारा तरुण मनोरुग्ण असल्याचे उघड !
मुंबई – अमेरिकन वाणिज्य वकिलातीला धमकीचा ई-मेल पाठवणारा तरुरण मानसिक आजाराने ग्रस्त असल्याचे उघड झाले आहे. तो उच्चशिक्षितही आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. ‘अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी माझी जाहीर माफी मागावी, अन्यता मी सर्व अमेरिकन वकिलाती उडवीन’, अशी धमकी त्याने दिली होती. ‘मी अमेरिकेचा कुख्यात नागरिक आहे. माझ्यावर अमेरिकेत १९ प्रकरणे प्रलंबित आहेत. मी अनेक अमेरिकेतील नागरिकांना मारण्याचा कट रचला आहे’, असेही त्याने म्हटले होते.