रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय
१. अधिवक्ता योगेश भास्कर पाटील, कुस्तुबे, जळगाव, महाराष्ट्र.
अ. ‘आश्रमात अतिशय सात्त्विकता असून या ठिकाणाहून जाण्याचे मन होत नाही.
आ. साधना हेच ईश्वरप्राप्तीचे अंतिम सत्य आहे.’
२. अधिवक्ता भरत भाऊराव देशमुख (माजी अध्यक्ष, महाराष्ट्र आणि गोवा बार काऊन्सिल), जळगाव, महाराष्ट्र.
अ. ‘आश्रम पाहून मनाला अतिशय आनंद वाटला.
आ. मला आश्रमात सुख, शांती आणि समाधान वाटले.
इ. माझी शारीरिक आणि मानसिक ऊर्जा वाढली.’
३. श्री. गणेश सुभाषराव देशमुख (उद्योगपती), लातूर, सोलापूर, महाराष्ट्र.
अ. ‘रामनाथी आश्रम पाहून ‘साक्षात् ईश्वराचे घर कसे असते ?’, याची मला प्रचीती आली.
आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हा जो ‘विश्वरूपी आश्रम’ बनवला आहे, तो बघून माझी भावजागृती झाली आणि त्यांच्याप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली.
इ. आश्रम पुष्कळ छान आहे.’
४. डॉ. लता शर्मा (राष्ट्रीय सचिव, संयुक्त भारतीय धर्म संसद (महिला प्रकोष्ठ (विभाग)), जयपूर, राजस्थान.
अ. ‘आश्रम पाहून मनाला समाधान प्राप्त झाले. चोहीकडे सकारात्मक ऊर्जा जाणवली.’
५. अधिवक्ता जितेंद्र कु. सिंह, मुजफ्फरपूर, बिहार.
अ. ‘आश्रमात येऊन साधनेप्रती आत्मविश्वास जागृत झाला. शांती आणि अध्यात्म याविषयींच्या ज्ञानात वाढ झाली. आश्रमाची व्यवस्था अत्युत्तम आहे. येथे येऊन हिंदु धर्माला आणखी पाठबळ मिळत आहे. ज्यामुळे हिंदु राष्ट्राची स्थापना करणे शक्य होऊ शकते.’
(सर्व सूत्रांचा दिनांक : १९.६.२०२३)