Bareilly GHAR VAPSI : बरेली (उत्तरप्रदेश) येथे शाहिदाने ‘घरवापसी’ करून ओमप्रकाश यांच्याशी केला विवाह !
|
(घरवापसी म्हणजे हिंदु धर्मात प्रवेश करणे)
बरेली (उत्तरप्रदेश) – येथील शाहिदा या मुसलमान महिलेने १४ फेब्रुवारी या दिवशी हिंदु धर्म स्वीकारला आणि ओमप्रकाश या हिंदु पुरुषाशी विवाह केला. या वेळी शाहिदाचे शारदा असे नामकरण करण्यात आले. शाहिदाने तिच्या मद्यपी मुसलमान पतीला आधीच घटस्फोट दिला आहे. त्याच्यापासून तिला दोन मुले आहेत. तेही यापुढे हिंदु धर्मानुसार आचरण करणार आहेत. त्यांची नावे आता अहरामऐवजी रोहित आणि सादऐवजी रोहन असे असेल. या घरवापसीसाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी त्यांना साहाय्य केले आहे.
शाहिदा हिचा बुलंदशहरमध्ये एका मुसलमान तरुणासह विवाह झाला होता; परंतु तो पुष्कळ मद्यपान करून तिला अमानुष मारहाण करत असे. तो काही काम करत नसल्याने तिच्यावरच घराचे दायित्व आले. पुढे त्यांना दोन मुले झाली, तरीही पतीमध्ये काही सुधारणा झाली नाही. पुढे भांडणे विकोपाला जाऊन शाहिदाने त्याच्याकडून घटस्फोट घेतला.
In Bareilly (Uttar Pradesh), Shahida, after returning to Hinduism ('Ghar Wapsi'), married Omprakash.
👉Freed from the torment of an alcoholic Mu$l!m husband, Shahida became Sharda.
👉Both children from her first husband will follow Hindu practices.
घर वापसी I बरेली pic.twitter.com/hIrqdKfY2m
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 17, 2024
१. शाहिदाला माहेरून विशेष साहाय्य मिळाले नाही. त्यामुळे ती गाझियाबादला आली आणि तेथे नोकरी करू लागली. तेथेच ओमप्रकाश हेही काम करत असत. त्यांचा विवाह झाला नव्हता. त्यांनी शाहिदाला विविध समस्यांच्या वेळी अनेक वेळा पुष्कळ साहाय्य केले. दोघांमध्ये प्रेम जडले आणि शाहिदानेच त्यांच्याशी विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली.
२. यासाठी ओमप्रकाश यांनी कायदेतज्ञ यांचा सल्ला घेतला. तसेच बरेलीच्या हिंदु जागरण मंचचे अधिकारी हिमांशू पटेल यांच्याशी संवाद साधला. १४ फेब्रुवारी या दिवशी भीतानाथ मंदिरात दोघांचे वैदिक विधींनुसार विवाह झाला. (कुठे स्वत:ची मुसलमान ओळख लपवून हिंदु महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढणारे आणि पुढे त्यांची हत्या करणारे अथवा अरब देशात विकणारे धर्मांध मुसलमान, तर कुठे सर्वांगांनी विचार करून असाहाय्य मुसलमान महिलेशी विवाह करणारे हिंदू ! – संपादक)
स्वेच्छेने घरवापसीसाठी इच्छुक असलेल्यांना सर्वतोपरी साहाय्य करू ! – हिंदु जागरण मंच
अशा हिंदुत्वनिष्ठ संघटनाच हिंदु धर्माच्या खरी शक्ती होत !
हिंदु जागरण मंचचे पदाधिकारी हिमांशू पटेल म्हणाले की, पती-पत्नी दोघेही प्रौढ आहेत. शाहिदा तिचा पती ओम प्रकाशसमवेत पुष्कळ आनंदी आहे आणि तिने कोणत्याही दबावाविना विवाह करण्याची इच्छा असल्याचे सांगितले आहे. स्वेच्छेने घरवापसी परतण्यास इच्छुक असलेल्यांना सर्वतोपरी साहाय्य करू !