शिवाजीनगर, पुणे रेल्वे स्थानकासह पिंपरी-चिंचवडमध्ये बाँबस्फोट करण्याची माथेफिरूची धमकी !
पुणे – येथे शिवाजीनगर, पुणे रेल्वे स्थानकासह पिंपरी-चिंचवडमध्ये बाँबस्फोट करण्याची धमकी पोलिसांना देण्यात आली आहे. पुणे पोलिसांना भ्रमणभाष करून पुण्यासह मुंबई मध्येही बाँबस्फोट करण्याची धमकी देण्यात आली आहे. ही धमकी देणारी व्यक्ती माथेफिरू असून पुणे पोलिसांनी या व्यक्तीला कह्यात घेतले आहे. हडपसर भागात रहाणारी ही व्यक्ती माथेफिरू असून त्याने ही अफवा पसरवली आहे, असे स्पष्टीकरण पुणे पोलिसांनी दिले आहे.
संपादकीय भूमिका :वारंवार धमक्या देणार्यांचे कंबरडे मोडेल, अशी कृती पोलीस केव्हा करणार आहेत ? |