जगातील सर्व समस्यांचे उत्तर सनातन धर्मात आहे ! – आनंदा मॅथ्यू, ‘इन क्वेस्ट ऑफ गुरु’या पुस्तकाचे लेखक
‘जगातील सर्व समस्यांचे उत्तर सनातन धर्मात आहे. अनेक जण इतरांना वेगवेगळ्या गोष्टी दान करत असतात. त्याऐवजी सर्वांना सनातन धर्माची सकारात्मक रहाण्याची शिकवण सांगावी. कोणत्याही प्रकारचे संकट आले, अडचणी आल्या, तरी आपण सकारात्मक रहावे. सकारात्मक दृष्टीकोन ठेवल्यास जीवनातील सर्व समस्या आणि अडचणी यांना सामोरे जाता येते, असे उद्गार अमेरिकी वंशाचे ‘सिनेमॅटोग्राफर’ (सिनेमॅटोग्राफर म्हणजे अशी व्यक्ती जो चित्रपट बनवताना कॅमेरा हाताळतो किंवा कॅमेऱ्याच्या संदर्भातील कामे करतो) आणि ‘इन क्वेस्ट ऑफ गुरु’या पुस्तकाचे लेखक आनंदा मॅथ्यू यांनी केले. आनंदा मॅथ्यू यांची मुलाखत साप्ताहिक ‘हिंदुस्थान पोस्ट’चे संपादक श्री. स्वप्नील सावरकर यांनी घेतली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी आनंदा मॅथ्यू यांनी जीवनाकडे सकारात्मक पहाता येईल, याविषयीही सांगितले.
१. आनंदी जीवन जगण्याच्या ५ उपयुक्त सोप्या सूचना
आनंदा मॅथ्यू यांनी आनंदी जीवन जगण्याच्या ५ उपयुक्त सोप्या सूचना या वेळी सांगितल्या. त्या पुढीलप्रमाणे :
अ. सकाळी उठल्यावर प्रथम ‘ईश्वरा’, ‘भगवंता’, ‘देवा’ अशा कोणत्याही सकारात्मक शब्दाचा उच्चार करावा.
आ. ‘देवाने आपल्याला जीवनात हा आणखी एक दिवस दिला’, यासाठी कृतज्ञता व्यक्त करावी.
इ. देवा ‘मला हे दे’, ‘ते मिळू दे’ असे काही मागू नये. त्यापेक्षा ‘माझ्यासाठी जे आवश्यक आहे, ते तू घडव’, अशी प्रार्थना करावी.
ई. काही वेळा आपण जशी कल्पना करतो, त्यापेक्षा वेगळे घडते. अशा वेळी कठीण प्रसंगांकडे सकारात्मक दृष्टीने पहावे.
उ. इतरांनाही साहाय्य करतांना त्यांना सकारात्मक दृष्टी द्यावी.
(साभार : साप्ताहिक ‘हिंदुस्थान पोस्ट, मराठी’चे संकेतस्थळ)
संपादकीय भूमिकामूळ कॅथोलिक आणि अमेरिकी असलेल्या आनंदा मॅथ्यू यांना सनातन धर्माचे जे महत्त्व लक्षात येते, ते भारतातील तथाकथित बुद्धीप्रामाण्यवादी, पुरो(अधो)गामी आणि हिंदुद्वेष्टे यांच्या लक्षात येत नाही, हे लक्षात घ्या ! ते केवळ हिंदु धर्माचा द्वेष आणि त्यावर टीका करण्यात धन्यता मानतात ! |