आतंकवादी दर्ग्यात शिरल्याची खोटी माहिती देणारा ८४ वर्षीय धर्मांध अटकेत !
डोंगरी (मुंबई) येथील प्रकार !
मुंबई – येथील दक्षिण मुंबई परिसरातील डोंगरी भागातील बाबा दर्ग्यात २ सशस्त्र आतंकवादी शिरले असल्याचा निनावी संपर्क करणार्या ८४ वर्षीय भगवान भापकर उपाख्य नजरूल इस्लाम शेख याला अटक करण्यात आली आहे. (या धर्मांधाने ‘भगवान भापकर’ हे हिंदु नाव का धारण केले होते, याचीही चौकशी होणे आवश्यक ! – संपादक) तो विक्रोळी येथील रहिवासी आहे. संपर्क करण्यामागील त्याचा हेतू सुस्पष्ट झालेला नाही. चौकशीअंती दर्ग्यात कुणीही शिरले नसल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी पोलिसांनी नजरूलच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. त्याची चौकशी चालू आहे.
84-year-old fanatic booked for hoax call to the police: Alleged that #terrorists have entered the Dargah.
📍 Dongri (Mumbai).
👉 Strict action should be taken against such anti-social bigots for wasting the time and manpower of police force, by providing false information on a… pic.twitter.com/YtKkN8IsIF
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 17, 2024
संपादकीय भूमिकाआतंकवाद्यांच्या संदर्भात खोटी माहिती पुरवून पोलीसदलाचा वेळ आणि मनुष्यबळ यांची हानी करणार्या अशा समाजकंटक धर्मांधांवर कठोर कारवाई करणे आवश्यक ! |