UP Time Bomb : इम्राना नावाच्या महिलेला १०० हून अधिक बाँब विकल्याची जावेद शेख याची माहिती !
|
मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) – येथील जावेद शेख या तरुणाला पोलिसांच्या विशेष कृती दलाने अटक करून त्याच्याकडून ४ जिवंत टाइम बाँब जप्त केले होते. त्याच्या चौकशीनंतर ‘इम्राना नावाच्या महिलेने जावेद याला १०० बाँब बनवण्यास सांगिले होते’, अशी माहिती मिळाली आहे. वर्ष २०१३ मध्ये येथे झालेल्या दंगलीच्या वेळी इम्रानाने त्याला बाँब बनवण्यास सांगितले होते. त्यानंतर बाँब बनवून ते मुसलमानांना विकण्यातही आले होते. या दंगलीत अनेकांचा मृत्यू झाला होता. पोलीस आता इम्रानाचा शोध घेत आहेत.
(सौजन्य : News18 UP Uttarakhand)
१. पथकाचे विशेष पोलीस अधीक्षक ब्रिजेश सिंह यांनी सांगितले की, प्राथमिक चौकशीत असे दिसून आले आहे की, वर्ष २०१३ मध्ये मुझफ्फरनगरला झालेली दंगल आणि वर्ष २०२० मध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात झालेली दंगल, या दंगलींच्या वेळी इम्रानाने तिच्या लोकांमध्ये १०० हून अधिक बाँब वाटले होते. ते बाँब बनवण्यामागे जावेदची भूमिका तपासली जात आहे. जावेदला बाँब बनवण्याच्या आणखी मागण्या मिळाल्या होत्या. तो हिंसाचार आणि दंगल यांसाठी बाँब बनवत असे. जावेद दिवसा पदपथावर टी-शर्ट आदी कपडे विकायचा आणि रात्री बाँब बनवायचा.
२. जावेदच्या अटकेनंतर त्याला बाँब बनवण्यासाठी मिळालेल्या मागणीची सूचीही जप्त करण्यात आली आहे. या सूचीमध्ये असणार्या लोकांचा आता पोलीस शोध घेत आहेत.
३. जावेदने चौकशीच्या वेळी सांगितले की, इम्राना ही तंत्रक्रियाही करते. इम्राना शामली जिल्ह्यातील मूळ रहिवासी आहे; परंतु ती मुझफ्फरनगरमधील मुसलमानबहुल खालापार भागात रहात होती. येथे धाड टाकण्यात आली; मात्र त्यापूर्वीच ती पसार झाली होती. इम्रानाने त्याला ‘बाटली बाँब बनवण्यासाठी ५० सहस्र रुपये देऊ’, असे सांगितले होते. यासाठी तिने जावेदला १० सहस्र रुपये आगाऊ दिलेही होते. बाँब बनवल्यानंतर उर्वरित ४० सहस्र रुपये देण्याचे आश्वासन इम्रानाने दिले होते. हे बाँब कुठे वापरले जाणार होते ? याची माहिती केवळ इम्रानालाच ठाऊक आहे.
४. जावेदने मुझफ्फरनगरमधील त्याचे काका आणि आजोबा यांच्याकडून बाँब बनवण्याचे प्रशिक्षण घेतले होते. त्याचे काका महंमद अर्शी मुझफ्फरनगरमध्ये फटाक्याचे दुकान चालवतात. त्यांनी यूट्यूबवरून काही माहिती गोळा केली. बाँब बनवण्यासाठी जावेदने डॉक्टरांकडून ग्लुकोजच्या बाटल्या मिळवल्या होत्या. सायकलच्या दुकानातून लोखंडी गोळ्या आणल्या होत्या. त्याच वेळी घड्याळाच्या दुकानातून एक घड्याळ खरेदी केले होते.
५. जावेद नेपाळमध्ये जन्मला आणि वाढला. त्याचे सातवीपर्यंतचे प्राथमिक शिक्षणही नेपाळमध्ये झाले. त्याला २ भाऊ आणि १ बहीण आहे. ते सर्व जणही नेपाळमध्ये जन्मले आणि वाढले. त्याच्या बहिणीचे नेपाळमध्ये लग्न झाले असून भाऊ अमेरिकेत काम करतो. जावेदच्या वडिलांचा मृत्यू झाला असून आई अद्यापही नेपाळमध्ये रहाते.
संपादकीय भूमिका
|