पुणे येथील मगरपट्टा पोलीस चौकीतील साहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांसह तिघे निलंबित !
मगरपट्टा पोलीस चौकीमध्ये महिलेशी गैरवर्तन केल्याचे प्रकरण !
पुणे – ‘मगरपट्टा सिटी पोलीस चौकीमध्ये एका महिलेशी गैरवर्तन केल्याप्रकरणी साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद दोरकर, महिला पोलीस कर्मचारी उषा सोनकांबळे आणि वैशाली उदमले यांना निलंबित करण्यात आले आहे. त्याची खातेनिहाय चौकशी होणार असून त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल, असे पोलीस उपायुक्त आर्. राजा यांनी सांगितले आहे. (पुरोगामी महाराष्ट्रामध्ये पोलीस चौकीमध्ये महिलेशी चुकीचे वर्तन केल्याची घटना महाराष्ट्राला काळीमा फासणारी आहे. अशा घटनांमुळे पोलिसांची प्रतिमा मलीन होत आहे. – संपादक)
‘मगरपट्टा सिटी’मध्ये एका कुटुंबातील ऐवज चोरीला गेला. त्या कुटुंबाने घरकाम करणार्या महिलेवर चोरी केल्याचा संशय व्यक्त केला. त्यांनी मगरपट्टा पोलीस चौकीमध्ये तक्रार प्रविष्ट केली होती. संबंधित महिलेला पोलीस चौकीमध्ये ९ फेब्रुवारी या दिवशी बोलावून बेदम मारहाण केली. महिलेने पोलिसांना पिण्यास पाणी मागितले, तेव्हा ‘लघुशंका प्यायला दिल्याचा’ आरोप संबंधित महिलेने केला आहे. संबंधित महिला घरी न आल्याने तिचे कुटुंबीय विचारपूस करण्यासाठी पोलीस चौकीमध्ये गेले. तेव्हा पोलिसांनी नातेवाइकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मारहाणीमुळे महिलेला चालता येत नव्हते.
संपादकीय भूमिका
|