श्रीरामनिकेतन म्हणजे वैकुंठच ! – समर्थभक्त मंदारबुवा रामदासी, दादेगाव, बीड
कीर्तन शताब्दी महोत्सव !
सांगली – वासना म्हणजे ‘देह हाच मी आहे आणि सर्व काही मला, माझे आहे’, ही भावना दृढ करणारी एक शक्ती आहे. ही शक्ती जेव्हा रामरूप होईल, तेव्हा हे सर्व रामाचे आहे, हा भाव निर्माण होईल. रामसुख, रामबोध, रामरूप या सर्व गोष्टी हरि कीर्तनात प्राप्त होतात; म्हणून जेथे हरिकीर्तन चालते, तेथे ते श्रवण करण्यास जाणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जेथे हरिकथा चालते, भक्त देवाचे गुणगान करतात, ते वैकुंठच होय. या अर्थाने श्रीरामनिकेतन म्हणजे वैकुंठच आहे किंवा वैकुंठाकडे जाण्याचा मार्ग आहे, हे निश्चित आहे, असे प्रतिपादन दादेगाव, बीड येथील समर्थभक्त मंदारबुवा रामदासी यांनी केले. ते ‘श्रीरामनिकेतन’ येथे चालू असलेल्या कीर्तन शताब्दी महोत्सवात बोलत होते.