मराठा आरक्षणाला आमचा कायम पाठिंबा ! – नीतेश राणे, आमदार, भाजप
मुंबई – आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यातील सभा उधळणार असल्याचे वक्तव्य केल्यानंतरच भाजपचे नेते नारायण राणे यांनी त्यांना वडीलकीच्या नात्याने समुपदेश दिला. ‘मराठा आरक्षणाला आमचा कायम पाठिंबा आहे. आम्ही त्यांना कायम पाठिंबा दिला आहे, तसेच जरांगे पाटील यांना ‘तुम्ही राजकीय टीका करू नका’, हेच आम्ही सांगत आहोत’, असे भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले की, मराठा समाजासाठी आम्ही काय केले, ते आम्ही सांगण्याची आवश्यकता नाही. मराठा समाजाला स्वतःच्या हक्काचे टिकणारे आरक्षण मिळावे, हीच आमची भूमिका आहे. त्यासाठी आम्ही लढलोही आहोत. आता आरक्षणाचा प्रवास अंतिम टप्प्यात आम्ही नेला आहे. काही दिवसांतच हक्काचे आरक्षण मिळेल. त्यामुळे आपण समाजबांधवांनी समाजात एकजूट ठेवायला हवी. मराठा समाजावर कुठलेही संकट येईल, तेव्हा आम्ही समाजाच्या पाठीशी उभे राहू.