गणेशोत्सवात ४ दिवस मध्यरात्री १२ पर्यंत ध्वनीक्षेपकाचा वापर करण्याची अनुमती !
मुंबई – यंदा गणेशोत्सवात ४ दिवस मध्यरात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपकाचा वापर करण्यास जिल्हाधिकार्यांनी अनुमती दिली आहे. वर्षभरातील १५ दिवस सकाळी ६ ते रात्री १२ पर्यंत ध्वनीक्षेपकाचा वापर करण्यास अनुमती देण्यात येते. त्यांपैकी १३ दिवसांची सूची उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने जाहीर केली आहे. गेल्या वर्षी गणेशोत्सवात तीनच दिवस रात्री १२ पर्यंत ही अनुमती होती. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांनी या प्रकरणी खेद व्यक्त केला होता. वरील १३ दिवसांच्या सूचीत शिवजयंती, डॉ. आंबेडकर जयंती, महाराष्ट्र दिन, गणेशोत्सवातील ४ दिवस, नवरात्रोत्सवातील २ दिवस, लक्ष्मीपूजन, २४ डिसेंबर, ३१ डिसेंबर, तसेच ईद-ए-मिलाद यांचा समावेश आहे, तर आणखी २ दिवस महत्त्वाच्या कार्यक्रमांसाठी राखीव ठेवलेले आहेत.