आर्थिक कंबरडे मोडलेल्या ग्रीसने समलिंगी विवाहाला दिली कायदेशीर मान्यता  !

असे करणारा जगातील पहिला पुराणमतवादी ख्रिस्ती देश !

एथेन्स (ग्रीस) – आर्थिक कंबरडे मोडलेला युरोपीय देश ग्रीसने १५ फेब्रुवारी या दिवशी समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता दिली आहे. असे करणारा तो जगातील पहिला ऑर्थोडॉक्स (पुराणमतवादी) ख्रिस्ती देश ठरला आहे. पंतप्रधान किरियाकोस मित्सोटाकिस यांच्या उजव्या विचारसरणीच्या सरकारच्या नेतृत्वाखाली संसदेतील ३०० पैकी १७६ खासदारांनी विधेयकाच्या बाजूने मतदान केले. ७६ जणांनी विरोधात मतदान केले, तर २ जणांनी मतदानात सहभाग घेतला नाही. ४६ जण मतदानासाठी उपस्थित नव्हते. विधेयकाच्या समर्थकांनी मतदानाला ऐतिहासिक क्षण म्हटले. वाढत्या महागाईने चिंतेत असलेल्या देशात हे सूत्र विशेष खळबळ माजवू शकले नाही.

सौजन्य Reuters

नवीन कायदा समलिंगी जोडप्यांना ‘पालकांचे अधिकार’ प्रदान करतो. हा कायदा समलिंगी जोडप्यांना विवाह करण्याचा आणि मुले दत्तक घेण्याचा अधिकार देतो.

संपादकीय भूमिका 

यावरून आता भारतातील पुरो(अधो)गामी जमात पुन्हा एकदा समलिंगी विवाहास मान्यता देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींवर दबाव आणू लागल्यास आश्‍चर्य वाटू नये !