Manipur Violence : चुराचंदपूर (मणीपूर) येथील पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयावर जमावाचे आक्रमण : २ जणांचा मृत्यू
चुराचंदपूर (मणीपूर) – येथील पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयावर १५ फेब्रुवारीच्या रात्री ३०० ते ४०० जणांच्या जमावाने आक्रमण करून पोलिसांच्या वाहनांची जाळपोळ केली. या वेळी सुरक्षादलांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. या आक्रमणात २ जणांचा मृत्यू झाला, तर २५ जण घायाळ झाले.
2 killed as mob storms the office of Superintendent of Police at Churachandpur (Manipur). #ManipurViolence #ManipurUnrest
Video Courtesy : @TimesNow pic.twitter.com/MAZsj4L7mI
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 16, 2024
Central forces are being chased out from Churachandpur, public property are set ablazed by Kuki Zo Separatist. They even disrespected our Indian Tricolour by dehoisting it in the chaotic situation in Churachandpur. #KukiTerrorists_pulled_down_Tricolor… pic.twitter.com/Js84I7tpr2
— Dhiraj Luwang Vlogs (@dhiraj_luwang) February 15, 2024
मणीपूर पोलिसांनी सांगितले की, चुराचंदपूरचे पोलीस अधीक्षक शिवानंद सुर्वे यांनी पोलीस हवालदार सियामलाल पॉल यांना निलंबित केले होते. याच्या निषेधार्थ लोकांनी हे आक्रमण केले होते.
१४ फेब्रुवारी या दिवशी पॉलचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला होता. त्यात तो शस्त्रधारी लोकांसोबत दिसत होता. त्यावरून त्याला समर्थन करणार्या लोकांनी कार्यालयावर आक्रमण केल्याचे म्हटले जात आहे.