Saraswati Idol Procession Attacked : बिहारच्या दरभंगा आणि सीतामढी येथे धर्मांध मुसलमानांचे श्री सरस्वतीदेवीच्या मूर्तीच्या मिरवणुकीवर आक्रमण
|
दरभंगा (बिहार) – बिहारमधील दरभंगा आणि सीतामढी येथे १५ फेब्रुवारी या दिवशी श्री सरस्वतीदेवीच्या मूर्तीच्या विसर्जनाच्या मिरवणुकीवर दगडफेक, तसेच हाणामारी झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यातील दरभंगा येथील घटनेत मिरवणुकीवर मशिदीजवळ दगडफेक आणि आम्ल फेकण्यात आले होते. या वेळी देवीच्या मूर्तीची तोडफोड करण्यात आली. ‘स्वराज्यमाग’ या हिंदुत्वनिष्ठ वृत्तसंकेतस्थळाच्या पत्रकार स्वाती गोयल शर्मा यांनी दरभंगा येथील घटनेचा एक व्हिडिओ ‘एक्स’वर प्रसारित केला आहे.
सौजन्य : न्यूज 18 बिहार झारखंड
आक्रमणामुळे देवीची मूर्ती सोडून हिंदूंनी काढला पळ !
दरभंगाच्या कसाई टोला येथे सायंकाळी ५ च्या सुमारास मूर्ती विसर्जनासाठी जाणार्या लोकांवर दगडफेक करण्यात आली. यात अनेक जण घायाळ झाले. दगडफेक चालू होताच अचानक चेंगराचेंगरी झाली. लोकांनी देवीची मूर्ती सोडून तेथून पळ काढला. त्यामुळे धर्मांध मुसलमानांकडून श्री सरस्वतीदेवीच्या मूर्तीची तोडफोड करण्यात आली. यामुळे संतप्त झालेल्या लोकांनी येथील धर्मांधांची घरे, दुकाने आणि वाहने यांची तोडफोड केली. या हिंसाचाराच्या घटनेची माहिती मिळताच दरभंगाचे जिल्हाधिकारी, विशेष पोलीस अधीक्षक आणि पोलीसदल घटनास्थळी पोचले अन् त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. (असे पळपुटे हिंदू काय कामाचे ? देवतेच्या मूर्तीचे रक्षण करू न शकणारे हिंदू धर्म आणि देश यांचे कधीतरी रक्षण करू शकतील का ? – संपादक)
यात्रेचा मार्ग पालटल्याने तणाव
भालपट्टी पोलीस ठाण्याचे अधिकारी प्रिन्स कुमार यादव म्हणाले की, यात्रेचा मार्ग पालटल्याने अचानक तणाव निर्माण झाला. ही मिरवणूक कसाई परिसरातून जात असतांना दगडफेक चालू झाली. ही यात्रा मशिदीजवळ पोचण्यापूर्वीच तिच्यावर आक्रमण करण्यात आले. या प्रकरणी आतापर्यंत १३ जणांना अटक करण्यात आली आहे.
सीतामढी येथे धर्मांधांच्या दगडफेकीला दगडफेकीने प्रत्युत्तर !
सीतामढीच्या परिहार पोलीस स्टेशन परिसरात श्री सरस्वतीदेवीच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी जाणार्या हिंदूंवर दगडफेक करण्यात आली. ही घटना मसाहा टोला वॉर्ड क्रमांक १३ येथे घडली. या दगडफेकीला दगडफेक करून प्रत्युत्तर देण्यात आले. यात दगडफेकीमध्ये अनेक जण घायाळ झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. येथे मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
संपादकीय भूमिका
|