समाजात सुसंवाद घडवणे पीठाचे काम ! – शिवस्वरूप भेंडे, सचिव, करवीर पीठ
कोल्हापूर – हिंदूंच्या धर्मपीठावर आघात केल्यावर जे धर्मरक्षणासाठी उभे राहिले, त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी आणि त्यांचे आभार मानण्याच्या दृष्टीने हिंदुत्वनिष्ठांचा गौरव करण्यात येत आहे. समाजामध्ये सुसंवाद घडवणे आणि समाजात धर्मप्रसार करणे हे पीठाचे कार्य असल्याने कोणत्याही वादामध्ये पीठास प्रतिक्रिया द्यावयाची नाही, असे प्रतिपादन करवीर पीठाचे सचिव श्री. शिवस्वरूप भेंडे यांनी आज केले. शंकराचार्य पीठाच्या वतीने हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा गौरव स्वामीजींच्या हस्ते करण्यात आला. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
या प्रसंगी स्वामीजींच्या हस्ते रविकिरण इंगवले, किशोर घाटगे, संभाजी(बंडा) साळुंखे, संदीप सासने, पराग फडणीस, सौ. शोभाताई शेलार-पाटील, मनोहर सोरप आदी हिंदुत्वनिष्ठ सघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी पीठाचे अध्यक्ष अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, सदस्य सर्वश्री प्रसाद चिकसकर, रामकृष्ण देशपांडे, धनंजय मालू उपस्थित होते.