मुंबईत पाणीकपात ?
मुंबई – १ मार्चपासून मुंबईत १० टक्के पाणीकपात होऊ शकते. मुंबईला पाणी पुरवठा करणार्या सातही तलावांतील पाणीसाठा वेगाने अल्प होत आहे. त्यांत केवळ ४८ टक्के पाणीसाठा उरला आहे. त्यामुळे ‘भातसा आणि उर्ध्व वैतरणा धरणातील राखीव साठा मिळावा’, अशी मागणी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने राज्य सरकारकडे पत्राद्वारे केली आहे. राज्य सरकारने ही मागणी मान्य न केल्यास पाणीकपात करण्यात येऊ शकते.