मायणी (सातारा) पोलीस ठाण्यात शासनाधीन असलेल्या दुचाकी आगीच्या भक्ष्यस्थानी !
आगीचे कारण अस्पष्ट !
सातारा, १५ फेब्रुवारी (वार्ता.) – मायणी पोलीस दूरक्षेत्र परिसरात अचानक लागलेल्या आगीत शासनाधीन असलेल्या दुचाकी गाड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. यामध्ये विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी कह्यात घेतलेल्या गाड्या होत्या. आग आटोक्यात आणण्यासाठी ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न केले. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. ही घटना गंभीर असून आग कुणी लावली किंवा कशामुळे लागली, याचे अन्वेषण पोलिसांनी करावे, तसेच या घटनेच्या चौकशीसाठी स्वतंत्र पथक नेमण्यात यावे, अशी मागणी मायणी ग्रामस्थांकडून होत आहे.