नगर येथे ‘माहेश्वरी महिला स्पोर्ट डे’चे आयोजन !

कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करतांना कु. प्रतीक्षा कोरगावकर आणि अन्य प्रक्षिणार्थी

नगर, १५ फेब्रुवारी (वार्ता.) – ८ मार्च हा ‘जागतिक महिलादिन’ म्हणून साजरा होतो. त्यानिमित्त सर्व महिलांसाठी विशेष कार्यक्रम अथवा उपक्रम यांचे आयोजन केले जाते. भारतीय प्राचीन संस्कृती मातृसत्ताक होती, त्यामुळे भारतात महिलांना विशेष स्थान आहे. नगरमधील सावेडी माहेश्वरी महिला मंडळाने माहेश्वरी समाजातील महिलांसाठी विशेष उपक्रम आयोजित केले होते. त्याचाच एक भाग म्हणून महिलादिनानिमित्त ४ फेब्रुवारी या दिवशी ‘माहेश्वरी महिला स्पोर्ट डे’ आयोजित केला.

या कार्यक्रमामध्ये माहेश्वरी समाजातील विविध मान्यवरांची उपस्थिती होती. या उपक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘महिलांची सद्यःस्थिती, स्वसंरक्षणाची व शौर्यजागृतीची आवश्यकता’ याविषयी कु. प्रतीक्षा कोरगावकर यांनी उपस्थित महिलांचे प्रबोधन केले. त्याचसमवेत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने स्वसंरक्षणाची शौर्यशाली प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. या माध्यमातून सर्वांमध्ये शौर्य जागृती झाली. या वेळी समितीच्या कु. प्रतीक्षा कोरगावकर, कु. शिवलीला गुब्याड आणि समितीचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

या वेळी समितीच्या कार्यकर्त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानही करण्यात आला. या वेळी कु. यज्ञाली दंडवते, कु. अमृता भांड, कु. सुप्रिया वाकडे, कु. प्रांजल उदे, कु. गौरी तारडे, कु. अक्षदा राजदेव, श्री. साईराम देवेनपल्ली, श्री. मयूर म्यांना यांनी स्वरक्षणाची प्रात्यक्षिके सादर केली.

क्षणचित्र : राहुरी ब्राह्मणी गावातील मुलींनी ३ मासांत स्वतः स्वसंरक्षण प्रशिक्षण शिकून व्यासपिठावर पहिल्यांदा आत्मविश्वासाने प्रात्यक्षिके सादर केली.