दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणारी ५६ वर्षांची व्यक्ती अटकेत !

मुंबई – घरासमोर खेळणार्‍या दोन अल्पवयीन (वय वर्षे ८ आणि ९) मुलींचा विनयभंग केल्याप्रकरणी ५६ वर्षीय व्यक्तीला अंधेरी पोलिसांनी मंगळवारी अटक केली. (वासनांधांपासून आपल्या लेकीबाळींचे रक्षण करण्यासाठी पालकांनी सतर्क रहायला हवे ! अशा वासनांधांना कठोर शिक्षा करायला हवी ! -संपादक) विनयभंग झाल्यामुळे पीडित मुली घाबरल्या होत्या. याविषयी शिक्षिकेला सांगितल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने तक्रार केली. यानंतर गुन्हा नोंदवून वरील कारवाई करण्यात आली.