मीरा-भाईंदर येथे कुत्र्याप्रमाणे रस्त्यावरून चालणार्‍या तरुणीचा व्हिडिओ प्रसारित !

हे छायाचित्र/व्हिडिओ छापण्यामागे लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नसून वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. – संपादक

ठाणे – जिल्ह्यातील मीरा-भाईंदर येथील महापालिकेच्या समोरच्या रस्त्यावर एक तरुणी अर्धनग्न अवस्थेत गळ्यात कुत्र्यासारखा पट्टा बांधून आणि दुसरी विदेशी पोशाखात तिला ओढत नेत असल्याचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे. पाश्‍चात्त्य देशातील असे व्हिडिओ यापूर्वी प्रसारित झाले आहेत; मात्र भारतातही असा व्हिडिओ प्रसारित होणे, हे भारतीय संस्कृतील अतिशय लज्जास्पद असल्याचे लोकांचे म्हणणे आहे.

( सौजन्य : FPJ) हे छायाचित्र/व्हिडिओ छापण्यामागे लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नसून वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. – संपादक

प्रसिद्धीसाठी ‘स्टंट’ करणे किंवा पैज लावणे यांसाठी असे केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या तरुणीने हात पूर्ण झाकले असून पाय मात्र विनाकपड्याचे ठेवले आहेत. अनेकांनी तिचे चित्रीकरण केले आहे.

संपादकीय भूमिका 

आपल्या संस्कृतीत विविध योनींमधून मानवी जन्म मिळणे, ही महत्त्वाची गोष्ट समजली जाते. असे असतांना प्राण्यांप्रमाणे कृत्य कराविशी वाटणे, हे मानवाची अधोगतीच झाल्याचे दर्शवत नाहीत काय ? समाजाला साधना न शिकवल्याचे हे परिणाम आहेत !