Surya Namaskar Event : राजस्थानच्या शाळांमध्ये रथ सप्तमीनिमित्त उत्साहात पार पडला ‘सूर्यनमस्कार’ कार्यक्रम !

राजस्थान उच्च न्यायालयाने मुसलमान संघटनाची कार्यक्रमावर बंदी घालण्याची याचिका फेटाळली होती !

जयपूर (राजस्थान)- राजस्थानच्या भाजप सरकारने १५ फेब्रुवारी या दिवशी रथ सप्तमीच्या निमित्ताने शाळांमध्ये ‘सूर्यनमस्कार’ कार्यक्रमाने आयोजन केले होते. हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. राजस्थानचे शिक्षणमंत्री मदन दिलावर यांनी विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार कार्यक्रमात अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले होते. या कार्यक्रमावर बंदी घालण्याची मुसलमान संघटनांची मागणी राजस्थान उच्च न्यायालयाने आदल्या दिवशीच फेटाळून लावली होती. मुसलमान संघटनांचे म्हणणे होते की, सूर्यनमस्कारात श्‍लोकदेखील म्हटले जातात, जे इस्लामच्या विरोधात आहे; कारण मुसलमान केवळ अल्लाची पूजा करतात.

१. अनेक मुसलमान संघटनांनी ‘मुस्लिम फोरम’ नावाच्या एका मंचाच्या अंतर्गत ही याचिका प्रविष्ट केली होती. या मंचाच्या वतीने एम्.आय.एम्.चे सरचिटणीस काशिफ झुबेरी यांनी ही याचिका प्रविष्ट (दाखल) केली होती. (मुसलमान संघटना धर्मासाठी एकत्र येतात; मात्र हिंदु संघटना धर्मासाठी एकत्र येत नाहीत ! – संपादक)

२. मुसलमान संघटनांनी राजस्थानमधील शाळांमध्ये शिकणार्‍या मुसलमान विद्यार्थ्यांना या दिवशी बहिष्कार घालण्यास आणि शाळेत न जाण्यास सांगितले होते. (शाळेत या कारणाने न आलेल्या विद्यार्थ्यांवर शाळेने कारवाई केली पाहिजे ! – संपादक)

३. राजस्थान उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळतांना म्हटले की, ‘मुस्लिम फोरम’ ही शाळकरी मुलांची प्रतिनिधी नाही किंवा ती नोंदणीकृत संघटनाही नाही. अशा परिस्थितीत संबंधितांचा दावा फेटाळला जातो. (नोंदणीकृत नसतांना अशा संघटना थेट उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करत असतील, तर सरकारने अशांवर कारवाई करावी, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक)

४.  जमियत उलेमा-ए-हिंदचे राज्य सरचिटणीस अब्दुल वाहिद खत्री म्हणाले की, हिंदु सूर्याला देव मानतात; पण इस्लाममध्ये अल्लाच्या वर कुणीही नाही. (असे मुसलमान कधीतरी सर्वधर्मसमभाव आणि धर्मनिरपेक्षता यांचे पालन करू शकतील का ? केवळ हिंदूंनीच याचे आता किती दिवस पालन करायचे ? हे ठरवायला हवे ! – संपादक)

संपादकीय भूमिका

२१ जून हा ‘जागतिक योग दिवस’ साजरा केला जातो. यालाही भारतातील बहुतांश मुसलमान विरोध करतात; मात्र अनेक इस्लामी देश हा दिवस साजरा करतात. हे भारतातील मुसलमानांना ठाऊक असूनही हिंदुद्वेषापोटी सूर्यनमस्काराला विरोध करत असतात !