राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले महत्त्वपूर्ण निर्णय !
मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली १४ फेब्रुवारी या दिवशी मंत्रालयात पार पडलेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत. या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्रीमंडळातील अन्य सदस्य उपस्थित होते.
बैठकीत घेतलेले महत्त्वाचे निर्णय !
१. ‘मुख्यमंत्री ग्राम सडक योजने’त अतिरिक्त ७ सहस्र कि.मी. रस्ते आणि पुलाची कामे करणार.
२. ‘ना नफा, ना तोटा’ तत्त्वावर वाळू विक्री दर निश्चित करणार.
३. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील इंटर्नशिप विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात भरीव वाढ करण्यात आली असून दरमास १८ सहस्र रुपये मिळणार आहेत.
४. उच्च तंत्रज्ञानाच्या अतीविशाल उद्योगांना प्रोत्साहन देणार.
५. राज्यात जळगाव, लातूर, बारामती, सांगली (मिरज), नंदुरबार, गोंदिया या सहा ठिकाणी नर्सिंग महाविद्यालय चालू करणार.