फोंडा (गोवा) येथील सौ. सुचेता नाईक यांनी त्यांच्या यजमानांची पासष्ठी आणि स्वतःच्या एकसष्ठी शांतीविधीच्या वेळी आनंदावस्था आणि निर्विचारावस्था अनुभवता येणे
‘२३.२.२०२३ या दिवशी दिनांकानुसार आमच्या लग्नाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आमची दोन्ही मुले (श्री. हृषिकेश नाईक आणि श्री. केदार नाईक) आणि दोन्ही सुना सौ. अपर्णा हृषिकेश नाईक आणि सौ. कैवल्या केदार नाईक) यांनी माझ्या यजमानांची पासष्ठी आणि २४.२.२०२३ या दिवशी माझी एकसष्ठी साजरी केली. त्या वेळी जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. श्री. दामोदर वझेगुरुजी (आध्यात्मिक पातळी ६० टक्के) यांनी पूजेचे सर्व साहित्य आणून देवतांची मांडणी केली होती. त्यांनी केलेली मांडणी पाहूनच आमची भावजागृती होत होती. आम्ही दोघेही भावविभोर झालो होतो.
२. २४.२.२०२३ या दिवशी विधीला आरंभ होण्यापूर्वीच माझ्या मनाची स्थिती निर्विचार होती. मी त्या वेळी आनंदावस्था अनुभवत होते.
३. कुटुंबातील सर्वांनीच या विधीची सिद्धता गुरुपौर्णिमेच्या सोहळ्याप्रमाणे आणि भावपूर्ण केली होती. ‘हा विधी घरामध्ये होत नसून, आश्रमातच होत आहे’, असे मला वाटत होते.
४. श्री. वझेकाकांनी माझ्या यजमानांची देवता श्रीविष्णु आणि माझी मार्कंडेय अशा देवता सांगितल्या होत्या. त्या देवतांचे पूजन करतांना ‘आपण गुरुपूजनच (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे पूजन) करत आहोत’, असे वाटून माझी भावजागृती होत होती.
५. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याच कृपेमुळे शांतीविधीच्या वेळी आम्हाला आनंदावस्था आणि निर्विचारावस्था अनुभवता आली.
६. सर्व विधी पूर्ण झाल्यावर श्री. दामोदर वझेकाका ‘शांती का करायची ?’, हे सांगत असतांना त्यांचाही कंठ दाटून आला. तेव्हा आमची सर्वांचीच भावजागृती झाली.
७. मुलांच्या माध्यमातून परात्पर गुरुमाऊलीनेच हा सोहळा करून घेतला. आम्ही सर्व जण दिवसभर भावस्थितीतच होतो.
‘हे गुरुदेवा, आम्हा सर्वांकडून आपणास अपेक्षित अशी साधना होण्यासाठी आपली अशीच कृपादृष्टी असावी’, अशी आपल्या चरणी आर्ततेने आणि शरणागतभावाने प्रार्थना !’
– सौ. सुचेता नाईक, फोंडा, गोवा. (९.३.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |