पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते अबुधाबी येथील हिंदु मंदिराचे उद्घाटन
अबुधाबी (संयुक्त अरब अमिरात) – संयुक्त अरब अमिरातील पहिल्या हिंदु मंदिराचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी केले. अबुधाबी येथे हे मंदिर बांधण्यात आले आहे. उद्घाटनाच्या वेळी स्वामीनारायण संप्रदायाचे प्रमुख संत, स्वामी, तसेच देश आणि विदेशातून निमंत्रित करण्यात आलेले मान्यवर उपस्थित होते. ‘बी.ए.पी.एस्. (बोचासनवासी श्री अक्षर पुरुषोत्तम स्वामी नारायण संस्था) हिंदु मंदिर’ असे या मंदिराचे नाव आहे. सकाळी या मंदिरामध्ये श्री व्यंकटेश, श्री गणेश, भगवान शिव आदी मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. १ मार्चपासून भाविकांना हे मंदिर दर्शनासाठी उघडण्यात येणार आहे.
मंदिराच्या उद्घाटनाच्या पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिराच्या परिसरात फिरून मंदिराची सविस्तर माहिती जाणून घेतली. या वेळी त्यांना संतांकडून माहिती देण्यात आली.