Haldwani Violence : हल्द्वानी (उत्तराखंड) येथे बेकायदेशीर मशिदीच्या जागेवर उभारण्यात आली पोलीस चौकी !
|
डेहराडून (उत्तराखंड) – ८ फेब्रुवारी या दिवशी राज्यातील हल्द्वानी येथील बनभूलपुरा भागात धर्मांध मुसलमानांनी दंगल घडवली होती. स्थानिक प्रशासनाने बुलडोझरद्वारे तेथील बेकायदेशीर मशीद आणि मदरसा पाडल्यामुळे संतप्त धर्मांधांनी पोलिसांवर आक्रमण केले होते. त्या वेळी त्यांनी पोलिसांची शस्त्रास्त्रेही पळवून नेली होती. या आक्रमणात ५ दंगलखोरांसह ६ जण मारले गेले होते, तर ३०० हून अधिक जण घायाळ झाले होते.
मा०मुख्यमंत्री जी द्वारा बनभूलपुरा में सुरक्षा व्यवस्था को लेकर नए थाना खोले जाने की घोषणा के मात्र 24 घंटे के भीतर ही अतिक्रमण स्थल पर नई पुलिस चौकी स्थापित की गई। जिसका उद्घाटन बनभूलपुरा हिंसा में घायल महिला कर्मियों द्वारा किया गया। https://t.co/115kb3kn2Z
— Nainital Police Uttarakhand (@nainitalpolice_) February 14, 2024
यानंतर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी ‘जेथे बेकायदेशीर मशीद होती, तेथेच पोलीस चौकी बांधण्यात येईल’, अशी घोषणा केली. त्यानुसार २४ घंट्यांच्या आतच तेथे पोलीस चौकी उभारण्यात आली आहे. हिंसाचारात घायाळ झालेल्या दोन महिला पोलिसांकडून या चौकीचे उद्घाटनही करण्यात आले आहे. या ठिकाणी आता २४ तास पोलीस बंदोबस्त रहाणार आहे. नैनितालचे वरिष्ठ पोलीस आयुक्त प्रल्हाद नारायण मीणा यांनी याविषयीची माहिती दिली. या पोलीस चौकीचे दायित्व मुख्य हवालदाराकडे सोपवण्यात आले असून त्याच्यासमवेत ४ हवालदार आणि शिपाई कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
Police post set up at Haldwani (Uttarakhand), at the site where the illegal mosque was demolished; within 24 hours of the announcement by Chief Minister Dhami
➡️ Inauguration was done by 2 policewomen who were attacked by fanatics.
👉 After Uttar Pradesh and Assam, it is the… pic.twitter.com/Fl1c6BHrvM
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 14, 2024
संपादकीय भूमिकाजिहादी आतंकवाद नष्ट करण्यासाठी कसे प्रयत्न केले पाहिजेत ?, यावर उत्तरप्रदेश आणि आसाम यांच्यानंतर आता उत्तराखंडचे नाव समोर येत आहे. अशा प्रकारची कारवाई देशभरात होऊ लागली, तर काही काळातच ‘जिहादी आतंकवादा’ची नांगी ठेचली जाईल, यात शंका नाही ! |