Kazakhstan Hijab Ban : मुसलमानबहुल असतांनाही कझाकिस्तानमध्ये शाळांमध्ये हिजाबवर आहे बंदी !
(हिजाब म्हणजे मुसलमान महिलांनी डोके आणि मान झाकण्यासाठी वापरलेले वस्त्र)
कझाकिस्तान (अस्ताना) – राजस्थानमधील शाळांमध्ये हिजाबवर बंदी घालण्याचा प्रयत्न होत आहे. कर्नाटकमध्ये यापूर्वी भाजपचे सरकार असतांना शाळा आणि महाविद्यालये येथे हिजाब घालण्यावर बंदी घालण्यात आली होती, ती काँग्रेसचे सरकार आल्यानंतर उठवण्यात आली. मुसलमानांकडून हिजाबबंदीला विरोध केला जात असतांना रशियापासून वेगळ्या झालेल्या मुसलमानबहुल कझाकिस्तानमध्ये मात्र शाळांमध्ये हिजाब घालण्यास सरकारकने बंदी घातली आहे. ही बंदी विद्यार्थिनी आणि शिक्षिका दोघांसाठी आहे. मुसलमानबहुल असतांनाही कझाकिस्तान धर्मनिरपेक्ष देश आहे. येथे जवळपास ७० टक्के मुसलमान लोकसंख्या आहे. सरकारच्या निर्णयाला तेथील मुसलमान संघटनांनी विरोधही केला होता; मात्र सरकार मागे हटले नाही.
Although being a Muslim-majority country, there is a ban on #Hijab in schools in #Kazakhstan !
This is a slap on the face of fanatic Mu$lims in #India who consider themselves to be bigger followers of I$lam ! pic.twitter.com/WO0uKMz9n7
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 14, 2024
कझाकिस्तान सरकारने बंदी घालतांना म्हटले होते की, शालेय गणवेशामध्ये हिजाब घालण्यास मनाई आहे. कोणतेही विशिष्ट चिन्ह ते कोणत्या धर्माचे आहे, हे दर्शवते. शाळेत हे ठीक नाही. कायद्यापुढे सर्व धर्मांची समानता सुनिश्चित करणे आवश्यक आहे. कझाक सरकार धर्मनिरपेक्षतेशी तडजोड करणार नाही. अशा परिस्थितीत शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी शाळांच्या बाहेर लागू होणार नाही.
कझाकिस्तान धर्मनिरपेक्ष देश आहे आणि रहाणार ! – राष्ट्राध्यक्ष कॅसिम-जोमार्ट तोकायेव
या संदर्भात कझाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष कॅसिम-जोमार्ट तोकायेव म्हणाले होते की, आम्ही धर्मनिरपेक्ष देश आहोत आणि राहू. शाळा ही एक शैक्षणिक संस्था आहे जिथे लोक ज्ञान घेण्यासाठी येतात. धार्मिक श्रद्धा ही प्रत्येकाची वैयक्तिक गोष्ट आहे. आपल्या देशातील कायदा धार्मिक स्वातंत्र्याची हमी देतो. मला वाटते की, मुले मोठी झाल्यावर स्वतःचे निर्णय स्वतः घेणे योग्य आहे.
संपादकीय भूमिकास्वतः इस्लामचे अधिक पालनकर्ते असल्याचे समजणार्या भारतातील धर्मांध मुसलमानांना ही चपराकच आहे ! |