राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ‘बहुउद्देशीय संगणक केंद्र’ स्थापन करण्यात येणार !

प्रतिकात्मक चित्र

मुंबई – राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ५० ते १५० संगणक आसन क्षमता असणारे ‘ई वाचनालय आणि अभ्यासिका’ असलेले बहुउद्देशीय संगणक केंद्र स्थापन करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. त्यासाठी ६० कोटी ४२ लाख रुपये इतका निधी संमत करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात यातील २८ कोटी रुपये इतका निधी वितरीत करण्यास शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे. शिक्षणक्षेत्रात तंत्रज्ञानाचा अधिकाधिक उपयोग, ऑनलाईन शिक्षण, ऑनलाईन प्रशिक्षण या उद्देशाने ही केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत.