हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी घेतली चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक विपुल शहा यांची भेट !

डावीकडून सागर चोपदार, रमेश शिंदे, ग्रंथ घेतांना विपुल शहा, सुनील घनवट

मुंबई – हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी १३ फेब्रुवारी या दिवशी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक श्री. विपुल शहा यांची भेट घेतली. या वेळी ‘शहरी नक्षलवाद’, तसेच ‘हलाल प्रमाणपत्र’ या विषयांवर श्री. रमेश शिंदे यांनी विपुल शहा यांच्याशी चर्चा केली. या वेळी त्यांच्या समवेत हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आण छत्तीसगड राज्याचे संघटक श्री. सुनील घनवट आणि समितीचे मुंबई-ठाणे-रायगड समन्वयक श्री. सागर चोपदार हेही उपस्थित होते.

या वेळी श्री. रमेश शिंदे यांनी लिहिलेला ‘हलाल जिहाद’ हा ग्रंथ श्री. विपुल शहा यांना भेट दिला. विपुल शहा म्हणाले, ‘‘शहरी नक्षलवाद’, तसेच ‘हलाल प्रमाणपत्र’ हे विषय संवेदनशील आहेत. यांवर चर्चा होणे आवश्यक आहे.’’ नक्षलवादाच्या भयानक संकटाचे वास्तव स्पष्ट करणारा विपुल शहा यांचा ‘बस्तर’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी नक्षलग्रस्त भागात भेटी देतांना आलेले अनुभव या वेळी विपुल शहा यांनी सांगितले.

विपुल शहा यांची निर्मिती असलेला ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाला देशभरात मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली. लव्ह जिहादमध्ये फसलेल्या हिंदु युवतींच्या जीवनावरील वास्तव कथेचे चित्रण या चित्रपटात आहे.