‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी पुणे जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालये येथे निवेदन !
स्वातंत्र्याच्या नावाखाली पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणातून स्वैराचाराचे समर्थन करणार्या विकृतींना हद्दपार करायला हवे !
पुणे, ११ फेब्रुवारी (वार्ता.) – स्वैराचाराचे समर्थन करून तरुण पिढीला चुकीच्या मार्गावर नेण्याचे षड्यंत्र म्हणजे व्हॅलेंटाईन डे ! ‘व्हॅलेंटाईन डे’ ही विकृती असून युवक-युवतींचे जीवन धोक्यात आले आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’मुळे शाळा आणि महाविद्यालये यांच्या परिसरातील कायदा आणि सुव्यवस्था, तसेच शैक्षणिक वातावरण बिघडवणारी स्वैराचारी अन् चंगळवादी वृत्ती वाढत आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पुणे जिल्ह्यात शाळा-महाविद्यालयांत देण्यात आले. ही मोहीम राबवताना धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग होता.
१. पिंपळखुटे गावातील महिलांनी शिवणे येथील महाविद्यालयामध्ये ‘व्हॅलेंटाईन डे’ची हस्तपत्रके वितरित करून महाविद्यालयात निवेदन दिले. महाविद्यालयातील शिक्षकांनी मुलांचे प्रबोधन केले.
२. गुरुकुल माध्यमिक विद्यालय, सासवड येथे समितीच्या वतीने ‘व्हॅलेंटाईन डे’चे दुष्परिणाम आणि ही कुप्रथा बंद व्हावी याचे निवेदन देण्यात आले.
३. पारगाव, तालुका दौंड येथील रयत शिक्षण संस्थेच्या ‘न्यू इंग्लिश स्कूल’ आणि कनिष्ठ महाविद्यालय येथे जनजागृतीसाठी व्याख्यान घेण्यात आले. या वेळी ५०० हून अधिक विद्यार्थी उपस्थित होते. या व्याख्यानाचे नियोजन श्री. गणेश ताकवणे यांनी केले.