पालक्काड (केरळ) येथील ‘संस्कार’ या ‘चिन्मय मिशन’च्या कार्यक्रमामध्ये सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन !
पालक्काड (केरळ) – ‘चिन्मय मिशन’च्या वतीने ‘संस्कार’ हा कार्यक्रम स्वामी चिन्मयानंद यांच्या १०८ व्या जन्मदिनाच्या वतीने साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम पालक्काड येथील महानगरपालिकेच्या स्टेडियममध्ये पार पडला. या कार्यक्रमात अनेक आध्यात्मिक संघटना, विविध मठातील स्वामी आणि भक्तगण यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमात अध्यात्मातील अनेक विषयांवरील प्रवचने, चर्चासत्रे आणि अन्य सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. ‘हिंदु संस्कृती आणि अध्यात्म हे समाजापर्यंत पोचवणे अन् त्यांचे संवर्धन करणे’, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. सनातन संस्थेच्या वतीने या कार्यक्रमामध्ये ७ दिवस ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते. ‘चिन्मय मिशन’चे स्वामी स्वरूपानंदजी आणि ‘अद्वैत आश्रमा’चे स्वामी चिदानंदापुरी यांसह अनेक स्वामी अन् मान्यवर यांनी संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट दिली. या ग्रंथप्रदर्शनाला अनेक जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला, तसेच जिज्ञासूंनी सनातन संस्था सांगत असलेल्या साधनेविषयी जाणून घेतले.