Journalist HAMAS Commander : ‘अल् जझीरा’चा पत्रकार निघाला हमासचा वरिष्ठ कमांडर ! – इस्रायल
पत्रकारितेच्या नावाखाली आतंकवादाचा खेळ चालू असल्याची टीका
जेरूसलेम (इस्रायल) – ‘अल् जझीरा’ या वृत्तवाहिनीचा पत्रकार महंमद वाशाह हा हमासचा वरिष्ठ कमांडर आहे, असा दावा इस्रायलाच्या संरक्षणदलाने केला आहे. ‘पत्रकारितेच्या नावाखाली आतंकवादाचा खेळ चालू आहे’, असे या दलाने म्हटले आहे. याआधीही इस्रायलच्या हवाई आक्रमणात ठार झालेल्या अल् जझीराच्या २ पत्रकारांचे हमास आणि पॅलेस्टाईन इस्लामिक जिहाद या आतंकवादी संघटनांशी संबंध असल्याचे इस्रायलच्या संरक्षणदलाने म्हटले होते.
सौजन्य : टाइम्स नाऊ
१. काही आठवड्यांपूर्वी गाझामध्ये केलेल्या कारवाईच्या वेळी इस्रायलच्या सैन्याने महंमद वाशाह याचा लॅपटॉप जप्त केला होता. या लॅपटॉपमध्ये काही छायाचित्रे सापडली. या छायाचित्रांवरून तो हमासचा कमांडर असल्याचे आणि तो हमासकडून अनेक वेळा युद्धात सहभागी झाल्याचे दिसून येते.
“‘अल् जझीरा, आम्हाला वाटते की, तुमच्या पत्रकारांनी सर्व परिस्थितींवर निष्पक्ष वार्तांकन केले पाहिजे. त्यांनी आघाडीवर उभे राहून हमाससारखे युद्ध लढू नये.’ – इस्रायलच्या संरक्षणदलाचे ‘अल् जझीरा’ला आवाहन” |
२. इस्रायलच्या संरक्षणदलाचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल अविचाई आद्रे यांनी सांगितले की, वाशाह हा हमासच्या रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र युनिटमधील सर्वोच्च कमांडर असल्याचे लॅपटॉपमधील माहितीतून आढळून आले. वाशाह याने हमासच्या हवाई युनिटसाठी संशोधन आणि विकास कार्य चालू केले होते. त्याचा हमासशी थेट संबंध असल्याचे अन्वेषणात समोर आले आहे. पत्रकारितेच्या नावाखाली आणखी आतंकवादी कारवाया केल्या जात आहेत.
संपादकीय भूमिका‘अल् जझीरा’वर भारताने यापूर्वीच बंदी घातली आहे. अशा वृत्तवाहिन्यांवर आता जगानेच बंदी घालणे आवश्यक आहे ! |