Farmers Agitation Khalistani Support : शेतकर्यांच्या आंदोलनात खलिस्तानी आतंकवादी भिंद्रनवाले याचा झेंडा !
नवी देहली – शेतकरी आंदोलनाविषयीचा एक व्हिडिओ प्रसारित झाला आहे, ज्यामध्ये शेतकरी फतेहगढ साहिबहून अंबालाच्या शंभू सीमेजवळ ट्रॅक्टर घेऊन येतांना दिसत आहेत. हे सर्व ट्रॅक्टर देहली सीमेवर पोचणार आहेत. एकाच वेळी अनेक ट्रॅक्टर सीमेच्या दिशेने मार्गक्रमण करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यामध्ये दुसर्या क्रमांकावर असलेल्या ट्रॅक्टरवर खलिस्तानी आतंकवादी भिंद्रनवाले याच्या नावाचा झेंडा दिसत आहे. याआधीही वर्ष २०२०-२०२१ मध्ये देहलीच्या सीमेवर जेव्हा शेतकर्यांनी आंदोलन चालू केले होते, तेव्हा आंदोलकांकडे भिंद्रनवाले याचे फलक लावले होते.
Jarnail Singh Bhindranwale's flag spotted in the #FarmersProtest2024
This is evidence of #Khalistani terrorists' support for the farmers' agitation. The aim of this movement is not the welfare of farmers rather to create instability in the country. Therefore, it is imperative… pic.twitter.com/JC0ZCwBY8X
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 13, 2024
संपादकीय भूमिकाशेतकरी आंदोलनाला खलिस्तानी आतंकवाद्यांचे समर्थन असल्याचा हा पुरावा आहे. ‘शेतकर्यांचे भले व्हावे’, हा या आंदोलनाचा उद्देश नसून याद्वारे आंदोलनकर्त्यांना देशात अस्थिरता माजवायची आहे. त्यामुळे सरकारने आंदोलन करणार्यांच्या विरोधात कठोर पावले उचलणे आवश्यक ! |