राज्यात ‘जे.एन्.१’चे ६६६ रुग्ण !
मुंबई – महाराष्ट्रात जानेवारी मासाच्या आरंभी ‘जे.एन्.१’ या कोरोना महामारीच्या नव्या उपप्रकाराची बाधा झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली होती. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. राज्यात १ जानेवारीपासून आतापर्यंत ‘जे.एन.१’चे ६६६ रुग्ण सापडले होते. मागील ४२ दिवसांत राज्यामध्ये कोरोनाचे तब्बल २ सहस्र ७०३ रुग्ण सापडले, तसेच कोरोना महामारीमुळे २१ जणांचा मृत्यू झाला आहे. बहुतांश रुग्ण शहर भागात असून यामध्ये मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, पिंपरी-चिंचवड आणि छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका क्षेत्रांचा समावेश आहे.