देहली येथील श्री. चंद्रप्रकाश यांना रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिरात आलेल्या अनुभूती
१. ध्यानमंदिरातील गुरुपरंपरेतील श्रीचंद्रशेखरानंद यांचे छायाचित्र पहातांना आलेल्या अनुभूती
१ अ. श्रीचंद्रशेखरानंद यांचे छायाचित्र सजीव भासणे : ‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिरात गेल्यावर गुरुपरंपरेतील श्रीचंद्रशेखरानंद यांचे छायाचित्र पाहिल्यावर मला ते सजीव भासते.
१ आ. छायाचित्रातील त्यांचे डोळे बंद असूनही ‘ते माझ्याकडे पहात आहेत, म्हणजे ‘ते ध्यानमुद्रेत असले, तरीही सर्व साधकांना पहात आहेत. सर्व साधक त्यांच्या डोळ्यांसमोरच असतात’, असे मला जाणवते.
२. ध्यानमंदिरात साधकाकडून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना प्रार्थना केल्यावर जाणवलेली सूत्रे
ध्यानमंदिरात बसल्यावर माझ्याकडून गुरुदेवांना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) प्रार्थना झाली, ‘आपणच मला आपल्या चरणांपाशी ठेवावे. माझी पात्रता नसूनही आपण मला या आश्रमात येण्याची संधी दिली आहे. आपणच माझ्याकडून प्रयत्न करून घ्या.’
२ अ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकाचा हात पकडलेला असणे आणि त्यांच्या हाताची पकड घट्ट असल्याने ती कधीच सुटणार नसणे : त्या वेळी मी अनुभवले, ‘गुरुदेवांनी माझा हात पकडलेलाच आहे. माझ्याच हाताची पकड वारंवार सैल पडत असते; मात्र त्यांच्या हाताची पकड एवढी घट्ट आहे की, ती कधीच सुटणार नाही. मी मायेच्या विहिरीत पडलो आहे, तरीही त्यांनी माझा हात पकडला आहे.’
२ आ. जेव्हा माझी व्यष्टी साधना चांगली होते, तेव्हा मी मायेच्या विहिरीतून वर येत असतो. माझे प्रारब्ध आणि कर्म यांचे ओझे हलके होत असते.
२ इ. साधकाची व्यष्टी साधना होत नसतांनाही त्याने अनुभवलेली गुरुदेवांची कृपा : जेव्हा माझी व्यष्टी साधना होत नाही, तेव्हा मी खोलातच असतो आणि मला माझ्या कर्माचे ओझे अधिक भोगावे लागते; परंतु तेव्हा मी गुरुदेवांची प्रीती अनुभवतो. ते माझा हात सोडत नाही.
३. हे विचार आणि अनुभूती यांतून माझ्या लक्षात आले, ‘गुरुदेव प्रत्येक परिस्थितीत आमच्या समवेत असतात. आम्हाला चांगली व्यष्टी साधना करून लवकरात लवकर त्यांच्या चरणांशी जायचे आहे.’
– श्री. चंद्रप्रकाश, देहली (६.८.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |