ध्रुवीकरण हा जागतिक स्तरावरील सर्वांत मोठा सामाजिक धोका ! – तज्ञ
वॉशिंग्टन (अमेरिका) – ध्रुवीकरण हा जागतिक स्तरावरील सर्वांत मोठा सामाजिक धोका आहे, असे ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ने म्हटले आहे. या संघटनेने १ सहस्र ५०० जागतिक नेत्यांचे मत घेऊन हे मत मांडले आहे. फोरमने असेही म्हटले आहे की, या आव्हानावर परस्पर सहकार्याने मात करणे शक्य होऊ शकते. ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’मधील आर्थिक मानसशास्त्राचे प्राध्यापक मायकेल मुथुकृष्णा म्हणतात, एकत्र काम करण्याची भावना ही मानवाची सर्वांत मोठी शक्ती होय. संघर्षाचा धोका असतोच, पण सहकार्याचे शास्त्र दाखवते की, मैत्रीपूर्ण आणि सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण करून आपण मोठे आव्हान परतवू शकतो. केवळ परस्पर सहकार्याची भावना आपल्याला सशक्त करायची आहे.
जेव्हा लोक ध्येय साध्य करण्यासाठी अधिक लोकांसमवेत काम करतात, तेव्हा सहकार्याची भावना निर्माण होते. मुथुकृष्णा म्हणतात, ‘हा सहकाराचा नियम आहे. परस्पर लाभांमुळे दोन देशांमधील व्यापार युद्धाचा धोका अल्प होतो. एकत्र काम करून आपण विभक्तीकरण, ध्रुवीकरण आणि हवामान पालट यांसारख्या जगातील सर्वांत मोठ्या आव्हानांना तोंड देऊ शकतो.’
संपादकीय भूमिका
|