वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवानिमित्त रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या धर्मध्वजपूजनाच्या वेळी साधकाला आलेल्या अनुभूती
१. वातावरणात असलेली उष्णता सोहळ्याच्या ठिकाणी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, सद्गुरु आणि संत यांचे आगमन होताच न्यून होऊन शीतलता जाणवणे : ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवानिमित्त १४.६.२०२३ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात धर्मध्वजपूजन झाले. या सोहळ्याला जातांना मला पुष्कळ उष्णता जाणवत होती. सोहळ्याच्या ठिकाणी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, सद्गुरु आणि संत यांचे आगमन होताच मला वातावरणात शीतलता जाणवू लागली. त्या वेळी ‘सद्गुरु आणि संत यांच्या रूपाने आम्हाला स्थुलातून देवतांचे दर्शन लाभले’, याचा मला आनंद होत होता.
२. फुलांना भगवंताचा स्पर्श झाला की, त्यांना चैतन्य प्राप्त होते. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या हातात पुरोहितांनी फुले दिल्यावर मला तसेच जाणवले.
३. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी हीना अत्तर त्या ध्वजावर वहाण्यापूर्वीच मला हीना अत्तराचा सुगंध येत होता.
४. सोहळ्याच्या ठिकाणी गेल्यावर सच्चिदानंद परब्रह्म (डॉ.) जयंत आठवले यांचे स्मरण होणे : सद्गुरु आणि संत यांच्यातील चैतन्यामुळे माझा नामजप चालू झाला, तसेच मला आध्यात्मिक लाभही झाला. मी सोहळ्याच्या ठिकाणी गेल्यावर मला सच्चिदानंद परब्रह्म (डॉ.) जयंत आठवले यांचे स्मरण होत होते.
५. चैतन्यदायी सोहळ्यात वरुणदेवतेने कृपा करणे : सूत्रसंचालन करणार्या ताईने प्रार्थना करायला आरंभ केल्यावर वार्याची झुळूक आली. तेव्हा माझ्यावरील त्रासदायक शक्तीचे आवरण न्यून झाले. सोहळा चालू असतांना पाऊस पडला नाही. सोहळा झाल्यावर सद्गुरु आणि संत आश्रमात येताच जोराचा पाऊस चालू झाला.
आम्ही एवढे भाग्यवान आहोत की, या कलियुगात सद्गुरु आणि संत यांच्या रूपात असणार्या भगवंताच्या सहवासात रहाण्याची आम्हाला संधी लाभते. त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– श्री. अमोल लतारूपचंद मोरे, गोडोली, सातारा. (१४.६.२०२३)
|