सनातनच्या ११२ व्या (समष्टी) संत पू. (कु.) दीपाली मतकर यांनी केलेले अनमोल मार्गदर्शन !

पू. दीपाली मतकर

१. ‘परम पूज्य गुरुदेवांचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे), म्हणजेच भगवंताचे सातत्याने आपल्याकडे लक्ष आहे, तर आपलेही लक्ष सातत्याने परम पूज्य गुरुदेवांकडे असायला हवे.

२. एखादी कृती किंवा सेवा करतांना देव किंवा गुरु यांच्याप्रती भाव ठेवल्यास ताण येत नाही.

३. आपण केवळ गुरूंची भक्ती आणि स्तुती करायची आहे.

४. प्रसंग किंवा परिस्थिती स्वीकारण्याची स्थिती निर्माण झाली की, प्रगतीची वाटचाल चालू होते.

५. आपण जेव्हा भावाच्या स्तरावर शिकतो, तेव्हा ते अंतरात्म्यापर्यंत जाते आणि आपण ते कायमस्वरूपी शिकतो.’

– श्री. मिनेश पुजारे, सोलापूर सेवाक्रेंद (६.६.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक