जे पोलीस पोलीस ठाण्याचे रक्षण करू शकत नाहीत, ते जनतेचे रक्षण काय करणार ?

हल्द्वानी (उत्तराखंड) येथील मलिका बगीचा भागात ८ फेब्रुवारी २०२४ या दिवशी उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या आदेशाने बेकायदेशीर मदरसा पाडण्यास गेलेले प्रशासन आणि पोलीस यांच्यावर स्थानिक धर्मांध मुसलमानांनी मोठ्या प्रमाणात आक्रमण केले, तसेच नंतर येथील बनभूलपुरा पोलीस ठाण्यावर आक्रमण करण्यात आले. पोलीस ठाण्याला चारही बाजूंनी घेराव घालून येथील वाहनांना आग लावण्यात आली. हे आक्रमण करण्यासाठी दगडांसह पेट्रोल बाँब आणि बंदुका यांचाही वापर करण्यात आला. या हिंसाचारात आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत झालेल्यांमध्ये पिता-पुत्र जॉनी आणि अनस, एरिस, इसरार अन् सिवान यांचा समावेश आहे, तसेच १०० हून अधिक पोलीस घायाळ झाले आहेत. यांतील अनेकांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.’ (१०.२.२०२४)