मतदानाचा एक मिनिट तुमचे आयुष्य पालटवू शकते ! – पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ

श्री. पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ

आळंदी – प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज रामलल्लाच्या न्यासाचे कोषाध्यक्ष झाल्यामुळे कोषाध्यक्ष या पदाची प्रतिष्ठा उंचावली गेली. गेल्या १० वर्षांत आपण भारतीय प्रथमच सनातनी असल्याचा अभिमान बाळगू लागलो आहोत. हा अभिमान असाच ठेवायचा असेल, तर ५ वर्षांतून येणार्‍या निवडणुकीच्या वेळी सर्व जाती-पाती दूर ठेवून केवळ सनातनी म्हणून मतदान करायला जा. मतदानाचे हे एक मिनिट तुम्ही कुणाला निवडून आणता ? ते ठरवते. या एका मिनिटात तुमचे आयुष्य पालटण्याची क्षमता आहे. सनातनी हिंदू म्हणून जागे व्हा आणि योग्य ती व्यक्ती निवडून आणा, असे परखड मत श्री. पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी व्यक्त केले. ते आळंदी, पुणे येथे प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्या अमृत महोत्सवानिमित्त राष्ट्रभक्ती संमेलनात बोलत होते. ‘सरदार पटेल, सुभाषचंद्र बोस, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी कटिबद्ध व्हा’, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.