वर्ष २०२३ मधील ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या सेवेनिमित्त जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
‘१६ ते २२.६.२०२३ या कालावधीत रामनाथ मंदिर, गोवा येथे ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ झाला. त्यासंबंधी सेवा करतांना साधकाला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’संबंधी सेवा गुरुदेवांना अपेक्षित अशी होण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरवणे
‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’संबंधी सेवेतून गुरुदेवांचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) मन जिंकायचे आहे’, असे ध्येय मी घेतले होते. ‘गुरुदेवांच्या कृपेमुळे जी सेवा मिळेल, ती सेवा आनंदाने स्वीकारून गुरुदेवांना अपेक्षित अशी सेवा करण्याचा प्रयत्न करायचा’, असे मी ठरवले होते.
२. रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवानिमित्त धर्मध्वज पूजनाच्या वेळी आलेल्या अनुभूती
अ. १४.६.२०२३ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवानिमित्त धर्मध्वज पूजन आणि ध्वजारोहण झाले. त्या वेळी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे दर्शन होतांना माझी पुष्कळ भावजागृती होत होती. त्यांच्या दर्शनाने साक्षात् श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन झाल्याची अनुभूती मला आली.
आ. ध्वजारोहणाच्या दिवशी मला सूर्यनारायणाची कृपा अनुभवता आली. तेव्हा उन्हाची तीव्रता न जाणवता सौम्य प्रमाणात ऊन जाणवत होते.
इ. ध्वजारोहण सोहळ्याच्या वेळी संत आणि सद्गुरु यांच्या उपस्थितीमुळे वातावरणात चैतन्य जाणवत होते. त्या दिवशी मला पुष्कळ आनंद मिळाला.
३. संतांचे दर्शन झाल्याने त्रास आणि नकारात्मकता दूर होणे
एकदा मी एका साधिकेला विचारले, ‘‘ताई, आम्हाला सत्संग मिळणार का ?’’ नेमके त्याच दिवशी मी दुपारी एके ठिकाणी उभा असतांना मला संताचे दर्शन झाले. संतांच्या दर्शनाने माझी पुष्कळ भावजागृती झाली. माझे सर्व त्रास आणि माझ्यातील नकारात्मकता दूर झाली.
४. रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर मनाच्या स्तरावर झालेले पालट
अ. माझे मन केवळ गुरुचरणांशी कृतज्ञताभावात होते. माझ्या मनावर केवळ गुरुदेवांचे नियंत्रण होते. माझ्या मनात ‘सेवा विचारून करायला हवी. स्वतःकडे न्यूनता घ्यायला हवी. हा आश्रम माझ्या गुरूंचा आहे. सेवा गुरूंना कशी आवडेल’, असे विचार असायचे. त्यामुळे मला आनंदाने सेवा करता आली.
आ. मला सेवा करतांना शारीरिक त्रास झाले नाहीत आणि थकवाही जाणवला नाही. ‘गुरुदेवांच्या चैतन्यामुळे मी सेवा करू शकत आहे’, असे मला जाणवले.
इ. सेवा करतांना माझ्या मनाची निर्विचार स्थिती होती.
ई. आश्रमात आल्यावर स्वतःचे अस्तित्व विसरून अन्य साधकांचा विचार करण्याच्या प्रयत्नांत वाढ झाली.
गुरुदेवांच्या कृपेने या अनुभूती आल्याबद्दल श्री गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्री. शिवप्रसाद कब्बुरे, कडगांव, तालुका गडहिंग्लज, जिल्हा कोल्हापूर. (२३.६.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |