‘समर्पण’ आणि ‘साधनावृद्धी’ या ‘ऑनलाईन’ सत्संगांमुळे जिज्ञासूंना झालेले लाभ, शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्यांच्यामध्ये झालेले पालट !
१. सौ. सपना माणगावकर, माणगाव, कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग.
१ अ. झालेले लाभ
१ अ १. समष्टी सेवेला आरंभ : ‘सत्संगाला नियमित उपस्थित राहिल्यामुळे मी समाजातील लोकांना नामजप करायला सांगणे, त्यांना सामूहिक नामसत्संगाला जोडून देणे आणि सणांचे महत्त्व सांगणे, अशा सेवा करते. मी प्रथमोपचार शिबिरालाही गेले होते. आता मी ‘ऑनलाईन’ प्रथमोपचार वर्गालाही नियमित उपस्थित रहाते. मी आमच्या गावात प्रथमोपचार वर्ग चालू करण्यासाठी प्रयत्न करत आहे.
१ अ २. ‘समर्पण’ आणि ‘साधनावृद्धी’ या सत्संगांमुळे मला नामजप करतांना येणार्या अडचणींवर मात करता आली.
१ आ. शिकायला मिळालेली सूत्रे
१ आ १. मला सत्संगांमुळे व्यष्टी आणि समष्टी साधना, सत्सेवा इत्यादी सूत्रे शिकायला मिळाली.
१ आ २. चुकांविषयी गांभीर्य निर्माण होणे
अ. आधी मला ‘आपलेच योग्य आहे’, असे वाटायचे; पण सत्संगात ‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन’ हा विषय ऐकल्यावर मला स्वतःच्या चुका समजू लागल्या. त्याप्रमाणे माझ्याकडून प्रयत्न होऊन योग्य कृती होऊ लागली.
आ. आधी आळशीपणामुळे मला सकाळी उठण्यास जमत नसे. आता माझा हा स्वभावदोष अल्प झाला आहे. मी सकाळी लवकर उठून नामजप करते आणि व्यायाम करते. यामुळे आता मला दिवसभर प्रसन्न वाटते.
१ इ. स्वतःमध्ये झालेले पालट
१ इ १. आता मी नियमित कुंकू लावते.
१ इ २. आता मला प्रत्येक कृती करण्यापूर्वी प्रार्थना करणे आणि कृती झाल्यावर कृतज्ञता व्यक्त करणे, हे जमू लागले.
१ ई. मुलांना योग्य दृष्टीकोन दिल्यामुळे त्यांच्यामध्ये सकारात्मक पालट होणे : आता मी मुलांना योग्य दृष्टीकोन देऊ शकते. त्यामुळे मुलांमध्येही पालट झाला आहे. पूर्वी मुलगा दूरदर्शन आणि भ्रमणभाष पहाण्यात वेळ घालवत होता. त्यामुळे त्याला परीक्षेत अल्प गुण मिळायचे. तेव्हा त्याला ‘आईचे ऐकले नाही’, या चुकीची मी जाणीव करून दिली. आता तो नामस्मरण करतो, गणपति अथर्वशीर्ष म्हणतो, व्यायाम करतो आणि नियमित अभ्यासही करतो. हे पालट झाल्यामुळे प.पू. डॉक्टर यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
२. सौ. अनघा पंडित, कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग.
२ अ. झालेले लाभ
२ अ १. सत्संगात साधनेविषयी जे शिकायला मिळते, ते ‘इतरांना सांगावे’, असे वाटणे : ‘मी सत्संगात जाऊ लागल्यापासून इतरांना नामजप करण्यास सांगते. मी दैनिक ‘सनातन प्रभात’ची वर्गणीदार आहे. सत्संगामुळे मला योग्य साधना समजली. ‘व्यष्टी आणि समष्टी साधना, सत्पात्रे दान करणे, मनाचा त्याग करण्याचे महत्त्व’ हे विषय मला समजले. मला सत्संगात जे शिकायला मिळाले, ‘ते इतरांनाही सांगावे’, असे वाटते.
२ अ २. नामजपाचे महत्त्व समजणे : पूर्वी मी नामजप करत नव्हते. स्तोत्रपठण करत असे; परंतु सत्संगामुळे नामजपाचे महत्त्व समजले. आता मी अर्धा ते एक घंटा बसून नामजप करते. नामजप करतांना मन एकाग्र होते आणि भावपूर्ण नामजप होतो.
२ आ. शिकायला मिळालेली सूत्रे
२ आ १. सत्संगामुळे ‘सण कसे साजरे करायचे ?’, हे मला समजले. आता मी त्यानुसार सर्व सण साजरे करते.
२ आ २. पूर्वी मी एखाद्या प्रसंगाचा विचार न करता निर्णय घेत होते. आता एखादी कृती करतांना ‘योग्य कि अयोग्य ?’, याचा विचार करून निर्णय घेते. आता माझ्याकडून ‘एखाद्या प्रसंगात शांत कसे रहायचे ?’, असा विचार होतो.
२ आ ३. सत्संगामुळे स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेचे महत्त्व समजणे : ‘स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया राबवल्याविना आध्यात्मिक प्रगती होऊ शकत नाही’, याची मला जाणीव झाली; पण अजूनही माझ्याकडून प्रक्रिया नियमित राबवली जात नाही. यापुढे मी तसा प्रयत्न करणार आहे.
३. सौ. शीतल जयवंत मसूरकर, अंधेरी, मुंबई.
३ अ. झालेले लाभ
३ अ १. ‘साधना’ सत्संगात सांगितल्याप्रमाणे नामजप केल्यावर घरातील वातावरणात सकारात्मक पालट होणे : ‘साधना’ सत्संगात सहभागी झाल्यानंतर मी ‘श्री गुरुदेव दत्त’ आणि ‘श्री पावणाई देव्यै नमः ।’ हा कुलदेवतेचा नामजप चालू केला. त्यामुळे माझ्या घरातील वातावरणात पालट झाला आहे. आमच्या घरात एकत्र कुटुंबपद्धती आहे. मी नामसत्संग आणि साधना सत्संग यांना जोडल्यापासून आमच्यातील दुरावा अल्प झाला. ‘सत्संगामुळे येणार्या अनुभूतींमुळे आमच्या ज्ञानात भर पडते. घरातील सात्त्विकता वाढते आणि अडचणी दूर होतात’, असे माझ्या लक्षात आले.
३ अ २. सत्संगामुळे आम्हाला नामजपाचे महत्त्व, नमस्काराची योग्य पद्धत, तसेच विविध सणांविषयी शास्त्रोक्त माहिती मिळाली.
३ आ. शिकायला मिळालेली सूत्रे
१. समष्टी साधनेचे महत्त्व समजल्यावर मी मुलाच्या लग्नामधे ‘विवाह संस्कार’विषयीचे ५० लघुग्रंथ पाहुण्यांना भेट दिले.
२. स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्याच्या प्रक्रियेचे महत्त्व लक्षात आले.
४. कु. स्नेहा माधव, पाट-म्हापण, कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग.
४ अ. झालेले लाभ
४ अ १. नामजपामुळे भीती उणावणे आणि कार्यालयातील त्रास देणार्या सहकार्यांमध्ये सकारात्मक पालट होणे : ‘मी ग्रामपंचायत कार्यालयात लिपिक म्हणून नोकरी करते. मी समाजातील लोकांनाही नामजप करायला सांगते. सत्संगामुळे मला कुलदेवी आणि दत्त यांच्या नामजपाचे महत्त्व कळले. मी दत्ताचा नामजप बसून करते आणि येता-जाता कुलदेवीचा नामजप करते. त्यामुळे माझ्या मनाला शांत वाटते. पूर्वी मला फार भीती वाटायची; पण श्री दत्तगुरूंचा नामजप केल्यामुळे आता भीती वाटत नाही, तसेच पूर्वी मला कार्यालयातील सहकर्मचारी त्रास देत असत. त्यामुळे मला फार ताण यायचा. मी नामजप करू लागल्यापासून सहकार्यांच्या वागणुकीत सकारात्मक पालट दिसून आला. त्यांच्याकडून मला चांगले सहकार्य मिळू लागले.’
५. श्रीमती सुजाता गोसावी, लातूर, महाराष्ट्र.
५ अ. झालेले लाभ
५ अ १. स्वभावदोष निर्मूलनाविषयी समजल्यावर आळस आणि अव्यवस्थितपणा या स्वभावदोषांवर मात करता येणे : सत्संगामुळे ‘स्वभावदोष निर्मूलन’ याविषयी समजले. आता मला आळस आणि अव्यवस्थितपणा या स्वभावदोषांवर मात करता येते. काही नातेवाईक मला ‘साधना कशाला करतेस ?’, असे म्हणतात; पण सत्संगाच्या माध्यमातून ‘साधना करायलाच हवी’, हे माझ्या लक्षात आले.
५ अ २. कुलदेवी आणि दत्त यांचा नामजप केल्यावर अडचणीच्या वेळी स्थिर रहाता येते.
६. सौ. राजकन्या फत्तेपुरे, लातूर, महाराष्ट्र.
६ अ. ‘सत्संगाला जोडल्यापासून मन शांत वाटते, नामजप एकाग्रतेने होतो आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा जाणवते.’
(सर्व सूत्रांचा दिनांक १.२.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |