Magical Healing Ban : आसाम सरकार जादूटोण्याद्वारे उपचार करणार्यांवर कारवाई करणार !
या संदर्भातील विधेयकाला मंत्रीमंडळाची संमती
गौहत्ती (आसाम) – आसाम सरकार उपचाराच्या नावाखाली चालणार्या जादूटोण्याविषयी कठोर झाले आहे. असे उपचार रोखण्यासाठी सरकारच्या मंत्रीमंडळाने विधेयक संमत केले आहे. जादूटोणा करून उपचार करणार्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद या विधेयकात आहे. मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. बहिरेपणा, मूकपणा, अंधत्व, शारीरिक विकृती आणि ऑटिझम (हा आजार असणार्यांना प्रामुख्याने समाजात संवाद साधण्यात अडथळा येतो) यांसारख्या काही जन्मजात रोगांवर उपचार करण्याच्या नावाखाली जादूटोण्याद्वारे उपचार करण्याच्या पद्धतींना प्रतिबंध करणे आणि समाप्त करणे हे विधेयकाचे उद्दिष्ट आहे.
At the meeting of the #AssamCabinet we resolved to
👉 Introduce a bill to prohibit the practice of magical healing
👉 ₹259 cr for a Wildlife Safari and Rescue Centre at Namdang Reserve Forest
👉 Selected 10 cities/towns for a dedicated sustainable development program
1/2 pic.twitter.com/fuyVSQOXPH
— Himanta Biswa Sarma (@himantabiswa) February 10, 2024
📌 Assam state government to enact a law to punish magical healing practitioners
👉 The cabinet assents to the above bill#AssamCabinet #Healing #healthcare pic.twitter.com/9vWbK58mZg
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 11, 2024
मुख्यमंत्री सरमा म्हणाले की, मंत्रीमंडळाने ‘आसाम उपाय (वाईट प्रतिबंध) विधेयक, २०२४’ संमत केले. याद्वारे जादुटोणा उपचारांवर पूर्णपणे बंदी घालण्यात येईल. उपचाराच्या नावाखाली गरीबांकडून पैसे उकळणार्या डॉक्टरांवर कडक कारवाई केली जाईल.