Indian Women Pilots : भारतात महिला वैमानिकांची टक्केवारी सर्वाधिक !
भारतात महिला वैमानिकांची संख्या जागतिक सरासरीपेक्षा जवळपास तिप्पट !
न्यू यॉर्क (अमेरिका) – जागतिक स्तरावर वैमानिकांमधील महिलांच्या टक्केवारीचा अभ्यास केला, तर त्यात भारताचे नाव अग्रक्रमावर आहे. भारतात १५ टक्के वैमानिक या महिला आहेत. यानंतर आयर्लंड ९.९ टक्के, दक्षिण आफ्रिका ९.८ टक्के, ऑस्ट्रेलिया ७.५ टक्के, तर कॅनडात एकूण वैमानिकांपैकी ७ टक्के वैमानिक महिला आहेत. सर्व देशांची सरासरी टक्केवारी पाहिली, तर प्रत्येक देशात एकूण वैमानिकांपैकी केवळ ५.८ टक्केच महिला वैमानिक आहेत. यातून जगातील अन्य देशांच्या तुलनेत भारतातील महिला वैमानिकांची टक्केवारी जवळपास तिप्पट आहे, असे म्हणता येईल. ही आकडेवारी ‘वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्स’कडून प्रसारित करण्यात आली आहे.
Countries with highest percentage of women pilots:
🇮🇳 India: 15%
🇮🇪 Ireland 9.9%
🇿🇦 South Africa: 9.8%
🇦🇺 Australia: 7.5%
🇨🇦 Canada: 7.0%
🇩🇪 Germany: 6.9%
🇺🇸 United States: 5.5%
🇬🇧 UK: 4.7%
🇳🇿 New Zealand: 4.5%
🇶🇦 Qatar: 2.4%
🇯🇵 Japan: 1.3%
🇸🇬 Singapore: 1.0%🌍 World: 5.8%…
— World of Statistics (@stats_feed) February 10, 2024
या सूचीत सहाव्या स्थानी जर्मनी असून तेथे ही टक्केवारी ६.९ टक्के, अमेरिका ५.५ टक्के, युनायटेड किंगडम ४.७ टक्के, न्यूझीलंड ४.५ टक्के, तर कतार या इस्लामी देशात केवळ २.४ टक्केच महिला वैमानिक म्हणून कार्यरत आहेत.
संपादकीय भूमिकाकागदोपत्री भारतीय राज्यघटना धर्मनिरपेक्ष असली, तरीही भारताचा आत्मा हा हिंदु धर्मच आहे. ‘हिंदु धर्म स्त्रियांना तुच्छ लेखतो. त्यांना अधिकार नाकारतो’, अशी जी आरोळी तथाकथित पुरोगामी देशांकडून वारंवार ठोकली जाते, त्यांना आता या आकडेवारीवर काय म्हणायचे आहे ? |