लँड जिहाद, लव्ह जिहाद यांच्या विरोधात गोवंडी (मुंबई) येथे हिंदु जनआक्रोश मोर्चा !
गोवंडी (मुंबई) – मानखुर्द, गोवंडी आणि चेंबूर येथील हिंदु समाज लँड जिहाद, लव्ह जिहाद या संकटांपासून मुक्त व्हावा, यासाठी सकल हिंदु समाजाच्या वतीने जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये; म्हणून पोलिसांनी दक्षता घेतली होती. त्यासाठी दंगल नियंत्रण पथक, राज्य राखीव पोलीस दल यांना तैनात करण्यात आले. पोलीस आणि प्रशासन या समस्यांच्या विरोधात कोणतीच कारवाई करत नाहीत. त्यामुळे जनजागृती करण्यासाठी मोर्चा आयोजित केल्याचे हिंदु कार्यकर्त्यांनी सांगितले. ‘हे दुर्गे तू काली बन, लक्ष्मी बन, परंतु कभी न बुरखेवाली बन’, ‘हिंदु बेटिया हिंदु बनो लव्ह जिहादको पहचानो’, असे लिखाण असलेले फलक हिंदूंनी हाती घेतले होते. या मोर्चात हिंदु पुष्कळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपादकीय भूमिकालँड जिहाद, लव्ह जिहाद यांच्या विरोधात अकार्यक्षम ठरणारे पोलीस अन् प्रशासन काय कामाचे ? यासाठी हिंदूंना रस्त्यावर उतरावे लागणे दुर्दैवी ! |