त्रिकालज्ञानी आणि दूरदृष्टी असलेल्या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे ‘हिंदुराष्ट्र’, म्हणजेच ‘रामराज्य’ येण्याविषयीचे सत्यात येत असलेले उद्गार !
१. ‘हिंदु राष्ट्रा’विषयी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे बोल !
१ अ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी काही वर्षांपूर्वीच ‘आगामी ‘हिंदु राष्ट्र’ एक सहस्र वर्षे चालणारे असेल’, असे सांगणे : ‘२२.१.२०२४ या दिवशी अयोध्येत प्रभु श्री रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रभु श्रीरामचंद्र यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले, ‘हीच वेळ योग्य आहे. पुढील १ सहस्र वर्षांचा पाया आज रचायचा आहे. समर्थ, सक्षम, पवित्र, भव्य आणि दिव्य भारताची निर्मिती करायची आहे.’ पंतप्रधान मोदी यांचे हे वक्तव्य ऐकून गुरुमाऊली सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी एकदा ‘हिंदु राष्ट्रा’विषयी बोलतांना सांगितलेले वाक्य मला आठवले, ‘आगामी ‘हिंदु राष्ट्र’ सध्याच्या प्रचलित निवडणुकांच्या कार्यप्रणालीनुसार ५ वर्षांचे नसेल, तर ते पुढील १ सहस्र वर्षांहून अधिक काळ असेल.’
१ आ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘भारतात ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन झाल्यावर ते जगभरात विस्तृत होत जाईल’, असे सांगणे : आगामी ‘हिंदु राष्ट्रा’विषयी एकदा गुरुमाऊली सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना एकाने विचारले, ‘जगभरात ‘हिंदु राष्ट्र’ स्थापनेचे ध्येय कसे साध्य होईल ?’ तेव्हा ते म्हणाले होते, ‘तंबोर्याची एक तार झंकारली की त्याच कंपनसंख्येच्या इतर ताराही आपोआप झंकारतात, तसे भारतात ‘हिंदु राष्ट्र’ निर्माण झाल्यावर टप्प्याटप्प्याने पूर्ण विश्वात कार्यविस्तार होऊन संपूर्ण जगात ‘हिंदु राष्ट्र’ येईल.’
२. भारतात ‘हिंदु राष्ट्र’ कसे होणार’, याविषयी आलेली अनुभूती
२२.१.२०२४ या दिवशी अयोध्या येथे झालेल्या श्री रामलल्लाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमामुळे ‘हिंदु राष्ट्र’ येण्याचे कार्य कसे होणार ?’, याची एक छोटीसी अनुभूतीच अनुभवता आली. २२.१.२०२४ हा दिवस श्री रामलल्लाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेसाठी निश्चित झाल्यापासूनच भारतात राज्य, जिल्हा, तालुका, गाव, वाडी, वस्ती येथील अनेकांच्या मुखी रामनामाचा जयघोष चालू झाला. यासह जागतिक स्तरावरही या दिवशी अनेक कार्यक्रम झाले. अनेक देशांत श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. सर्वत्र आनंदीआनंद होता. यामुळे जागतिक स्तरावर निर्माण झालेले दैवी वातावरण, जगात दिसलेले हिंदूंचे ऐक्य आणि भारतासह जगात घुमलेला रामनामाचा हुंकार सर्वांना अनुभवता आला.
३. प्रार्थना
‘रामराज्य’ पुन्हा अवतीर्ण होण्यासाठी, म्हणजेच ‘हिंदु राष्ट्रा’साठी प्रभु श्रीरामचंद्र अयोध्येत विराजमान झाले आहेत. या निमित्ताने हिंदूंचे झालेले ऐक्य आणि प्रत्येकाच्या मुखी आलेले ‘राम’नाम ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना होईपर्यंत नित्य राहो आणि आम्हा सर्वांकडून सेवा म्हणून हे सर्व कार्य होवो’, अशी गुरुमाऊलीच्या सुकोमल चरणी शरणागतभावाने प्रार्थना !’
– श्री. संजय जोशी, कुडाळ, सिंधुदुर्ग (२३.१.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |