मध्य आणि हार्बर मार्गांवरील ८४ लोकल रहित !
मुंबई – मध्य रेल्वेतील एका मोटरमनने आत्महत्या केली असून त्याच्या अंत्यविधीला अन्य मोटरमन आणि रेल्वे कर्मचारी गेले. त्यामुळे मध्य आणि हार्बर रेल्वेवरील लोकल सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. दोन्ही मार्गांवरील ८४ लोकल रहित करण्यात आल्या आहेत. आणखीही लोकल रहित होण्याची शक्यता आहे. याचा मोठा परिणाम मुंबईकरांना भोगावा लागला. रेल्वेचा लाल सिग्नल पार झाला; म्हणून कारवाई होण्याच्या भीतीमुळे मोटरमनने आत्महत्या केली होती.